मालट्रकच्या धडकेमधे लोणीमावळा येथील शेतकरी बापू जगदाळे जागीच ठार.


पारनेर :
रविवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे अळकुटीवरुन शिरुरला भरधाव वेगाने जाणार्‍या मालट्रक क्र.एम. एच.०६,के.७१३१ ने लोणीमावळा येथील शेतकरी बापू गेणु जगदाळे वयवर्ष ६३ यांना उडवले असता सदर शेतकरी जागीच ठार झाला आहे.

लोणीमावळा येथील शेतकरी बापू गेणु जगदाळे, राहणार जगदाळेवस्ती,लोणीमावळा हे गावातील स्मशानभूमीमधे सावडण्याचा कार्यक्रम आवरुन घरी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला त्यांची मोटरसायकल क्र.एम.एच.१६,बी.पी.१८६१ जवळ उभे असताना,अचानक अळकुटीकडून शिरुरला रांजणगांव एमआयडीशीकडे  जाणारा ट्रक क्र.एम.एच.०६, के.७१३१ ने त्यांना समोरुन जोराची धडक दिली.अपघाताची तिव्रता एवढी भयानक होती की,यामधे शेतकरी बापू गेणु जगदाळे हे जागीच ठार झाले.ट्रक चालक कृष्णा जगन्नाथ वाघमारे रा.गंगापूर, जि.औरंगाबाद याचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळेच हा भिषण अपघात झाल्याचे प्रथमदर्शी समजते. या अपघातामधे शेतकरी बापू जगदाळे यांच्या डोक्याला, पोटाला,मनक्याला जबर मार लागला होता.तसेच हातपाय मोडल्यामुळे ते जागीच ठार झाले.घटना समजताच शेतकरी जगदाळे यांचा मुलगा सचिन बापू जगदाळे व डाॅ.सुभाष मावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. डाॅ.मावळे यांनी लागलीच पारनेर पोलीसस्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना घटनेबाबत कळविले.घटनेची खबर जगदाळे यांचा पुतण्या अनिल शिवाजी जगदाळे यांनी दिली असता,पारनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि.ए.उजागरे यांनी घटनास्थळाला भेट दिली व पंचनामा केला.नंतर डाॅ.मावळे व ग्रामस्थांनी पुढील उपचारा साठी पेशंट पारनेर ग्रामिण रुग्णालयामधे पाठविले. परंतु हाॅस्पीटलमधे जाण्यापूर्विच पेशंटचा मृत्यु झाल्याचे समजले.

पारनेर ग्रामिण रुग्णालयामधे शवविच्छेदन झाले.ट्रकचालक कृष्णा जगन्नाथ वाघमारे याला पोलीसांनी ताब्यात घेतले असुन,पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचे मार्गदर्शनाखाली पोलस हवालदार व्हि.एस. लोणारे हे करत आहेत.

सोबत : लोणीमावळा येथील अपघात झालेला ट्रक, चक्काचूर झालेली मोटरसायकल व सर्कलमधे मृत्यु झालेला शेतकरी बापू गेणु जदाळे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या