वैजापूर : तालुक्यातील जांबरगाव येथील गट नंबर १०१ व १०३ मध्ये जाण्यासाठी वहीवाटीचा रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला दि २५ रोजीच्या मध्यरात्री पासून सुरूवात केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील गट नंबर १०१ व १०३ येथे जाण्यासाठी वहीवाटीचा जुना रस्ता आहे. परतू काही लोकांनी हा रस्ता अडवून २५ शेतकर्यांना व त्यांच्या मुलांना या रस्त्याचा वापर करण्यास मज्जाव करुन शेतकऱ्यांचा माल व मुलांचा शिक्षणाचा हक्क एक प्रकाराने हिरावून घेतला आहे. तहसील प्रशासनाने रस्ता मोकळा करुन देण्यासाठी तारीख देण्यात आली. परंतु तहसील प्रशासनाच्या मंडळ अधिकारी व कर्मचारी आल्याने दोन वेळा पोलीस संरक्षण व टॅक्टर व जेसीबी चे १६, ३४६ पैसे भरुन ही हे पैसे वाया गेले आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. जो पर्यंत झालेला खर्च व रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय या शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे या निवेदनावर वैभव साठे यांच्या सह २४ जणांचे नावे आहेत.
0 टिप्पण्या