चक्क पोलीस ठाण्यासमोरचं तुफान हाणामारी

 श्रीगोंदा : शहरातील माध्यमिक विद्यालयाजवळ दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन किरकोळ धक्का बुक्की झाली. त्यानंतर त्यातील एका गटाच्या मुलाने मित्रांसोबत बस स्थानक परिसरात जाऊन मागासवर्गीय तरुणाच्या व्यावसायिक भावाच्या दुकानावर जाऊन त्याच्या दुकानातील सामान रस्त्यावर फेकले व त्याला मारहाण करण्यात आली.

हा वाद पोलीस स्टेशनला आला, त्यात राजकीय जेष्ठ नेते, नगरसेवक यांनी मध्यस्ती करत सायंकाळी बैठक घेऊन हा वाद मिटवण्याचे ठरविले. यांनतर काही जमाव पांगवण्यात आला. राजकीय नेत्यांनी नमूद वाद केलेल्या  दोघांनाही समोर घेवून प्रकरण मिटविण्याचे ठरविले. त्यासाठी दोन्ही गटाच्या लोकांना समोर बोलवण्यात आले आणि त्याचं ठिकाणी फज्जा उडाला. दुसर्‍या गटाचे लोक बाहेर आल्याचे समजताच काही युवकांनी त्यांना पोलीस ठाण्यासमोरील सेतुत नेऊन बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलीस ठाण्या समोरच झालेल्या या वादामुळे युवा पिढीपुढे राजकीय नेते ही हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. आपण नेहमी सिनेमात पाहतो तसे घटना घडल्यावर पोलीस येतात अगदी तसेच घडले सर्व काही झाल्यावर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांची दमदार एन्ट्री झाली. झालेल्या घटनेबाबत त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांकडून माहिती घेतली. त्यावेळी पोलीस कर्मचार्‍यांनी सांगितले की, याबाबत दोन्ही गटाचे कोणीही फिर्याद देण्यास तयार नाहीत. त्यावर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी व्ह्या..! कोणालाही सोडू नका, असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या