सिकंदर शेखने जिंकली मानाची गदा...!

श्रीगोंद्यात रंगला कुस्त्यांचा थरार; श्रीगोंदा : हलगी व डफाचा निनाद, मातीत रंगलेला कुस्तीच्या डावपेचांचा थरार, आखाड्या भोवती जमलेले श्रीगोंदे शहर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विजयी मल्लांवर होणारा बक्षिसांचा वर्षाव अशा उत्साहपुर्ण वातावरणात श्रीगोंदे शहरात गुरुवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त लोकनेते राजेंद्र (आबा) म्हस्के व पै.अप्पासाहेब सोनवणे आयोजीत निकाली कुस्तीचे मैदान उत्साहात पार पडले.

 महिला मल्लांना प्रोत्साह देण्यासाठी त्यांचे देखील विशेष कुस्त्या पार पडल्या. यामध्ये महिला कुस्तीपटूंनी आपल्या खेळाची कसब दाखवली.मल्लांच्या रंगलेल्या कुस्तीत एकापेक्षा एक सरस डावांनी उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. कुस्ती मैदानात महिला कुस्तीपटूंनी देखील आपली कसब दाखवून उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन केले.मैदानात पाचशे रुपये रक्कमे पासून पाच लाख रुपये बक्षीस रक्कमे पर्यंत कुस्त्या झाल्या.मैदानात अंतिम  कुस्ती पैलवान सिकंदर शेख व पैलवान कमलजीत सिंग यांच्या मध्ये झाली.अवघ्या तीन मिनिटांत सिकंदरने कमलजीत ला आसमान दाखविले व प्रक्षेकांची मने जिंकली.दोन नंबरची कुस्ती माऊली जमदाडे व पैलवान रविराज यांच्या मध्ये झाली.डावपेच दाखवत माऊली ने रविराज ला चीतपट केले.महिला विभागात झालेल्या कुस्तीत धनश्री ने शिवांजलीला मात दिली.मैदानात तालुक्यातील पै.सुरेश पालवे,पै.आण्णा गायकवाड,पै.नितिन सोनवणे,पै दिपक सोनवणे,पै श्रीकांत रेपाळे,पै सिद्धार्थ कांबळे यांच्या सह आदी कुस्त्या झाल्या व हे सर्व पहिलवान विजयी देखील झाले.मैदानातील सर्वच मनमोहक कुस्त्यांचा  प्रक्षेकांनी मनसोक्त आनंद लुटला.

या भव्य निकाली कुस्ती पाहण्यासाठी खासदार सुजयदादा विखे,पारनेरचे आमदार निलेशजी लंके,आ.बबनराव पाचपुते,माजी आमदार राहुलदादा जगताप,टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, अनिकेत घुले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.युवानेते प्रमोद म्हस्के यांनी सर्वांचे स्वागत केले.

मैदानात पंच म्हणून पै.नाना सोनवणे पै.नंदू रेपाळे,पै विष्णू राऊत,पै नितीन मोरे, यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या