सासवड येथे होणार म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा

 सासवड :महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची क्रीडावर्धिनी दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करते. यावर्षीचे हे ११ वे वर्ष आहे. ज्या पद्धतीने 14 वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याप्रकारच्या स्पर्धा प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जात नाही याचा विचार करून संस्थेने या  स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.  शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 ते रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 पर्यंत होणाऱ्या स्पर्धांचे यजमानपद संस्थेच्या सासवड येथील बाल विकास मंदिर या शाळेकडे आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये लंगडी , डॉजबॉल, गोल खो-खो ,सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश आहे. स्पर्धा कालावधीत बाहेर गावावरून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सासवड येथील शाळेत केली आहे.

प्रकाश झोतात या सर्व स्पर्धा पार पडणार आहेत

या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री महादेव कस गावडे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले निवृत्त हे उपस्थित राहणार आहेत तसेच के.जे. शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव हे देखील या याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू  सायली केरीपले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळेस बांधकाम व्यवसायिक शिरीष जाधव उपस्थित राहणार आहेत. 

या म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धेत संस्थेच्या बाहेर गावच्या १३ शाळा तसेच सासवड परिसरातील म. ए.सो.संस्थेच्या व इतर स्थानिक संस्थांच्या ६ शाळा अशा एकूण १८ शाळा मधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती संस्थेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सचिव भरत व्हणकटे, क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, वाघिरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, कल्पना नागनूर, मेघा जांभळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या