श्रीरामपूर MIDC जवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत तरूणाचा मृतदेह


श्रीरामपूर :
श्रीरामपूर MIDC मधील वाकडी रोडवर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी (यशवंत बाबा चौकी) परिसरात अज्ञात तरुणाचा आज दुपारी 4 च्या सुमारास मृतदेह वाढल्याने श्रीरामपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे . 

या तरुणाच्या अंगात लाल रंगाचे स्वेटर, पांढऱ्या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची जीन्स, पायात स्पोर्टस् बूट, निळी वेन्यू कंपनीची अंडरवेअर परिधान केलेले आहे. सदर मृतदेह च्या तोंडावर कोणत्यातरी टणक वस्तूने जोरात मारल्याचे या तरुणाचा चेहरा छिन्नविच्छिन्न झालेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी फौजफाट्यासह दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून केला असून हा तरुण नेकम कोण आहे त्याच नाव आहे आणि कोठील रहिवाशी आहे याची बद्दलची कोणतीच माहित मिळाली नसल्यचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे  

   गेल्या एक वर्षांपूर्वी बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह याच परिसरात टाकण्यात आला होता.आता पुन्हा याच भागात मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या