माजी क्रीडामंत्र्यांच्या 'कृष्णक्रीडा' 11 वर्षानंतर उजेडात...

 



शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल 


राष्ट्र सह्याद्री


 पुणे : शिवसेना नेता आणि माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यावर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तर याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दिलेल्या महिलेने पोलिसांना सांगितले की, सोलापूर येथील रहिवासी उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) व त्यांचा साथीदार महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


त्यांच्यासह उत्तम प्रकाश खंदारे यांच्या महिला सहकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण बी रेस्ट हाऊस आणि बिबवेवाडी येथे 2012 मध्ये सुरू झाले होते आणि त्यानंतरही सुरूच राहिले होते. तब्बल 11 वर्षांनंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


पट्ट्याने मारहाण करीत अनैसर्गिक कृत्य...


पीडितेच्या फिर्यादीनुसार, उत्तम खंदारे यांनी फिर्यादी महिलेला लग्नाची आमिष दाखवून आणि तिच्या मुलांचा सांभाळ करतो असे भाषण चाकूच्या धाकाने तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक संभोग केला. फिर्यादीने महिलेने नकार दिला असता तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.


धनादेश दिले पण वाटलेच नाही...


या संबंधातून जन्माला आलेल्या मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून उत्तम खंदारे यांनी काही धनादेश फिर्यादी महिलेला दिले होते. परंतु ते धनादेश बँकेत वाटले नाही. त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी महिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या