कॉपी पुरवणार्‍या गुरूजनांना तब्बल 14 दिवसांची पोलिस कोठडी

पाच शिक्षकांसह एका उप केंद्रचालकाचाही समावेश

परभणी ः एखाद्या गंभीर गुन्ह्यात मोठी पोलिस कोठडी मिळण्याच्या घटना आपण नेहमी वाचतो. मात्र परीक्षेत पास होण्यासाठी कॉपी पुरवणार्‍या उपकेंद्र संचालकासह शिक्षकांना अटक केली जाते आणि त्यांना तब्बल 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची घटना घडली आहे. ही घटना घडली आहे परभणी जिल्ह्यातील. कॉपी करताना विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याच्या घटना परीक्षा काळात हमखास घडतात. मात्र कॉपी करण्यासा मदत करणार्‍यांना एवढी मोठी पोलिस कोठडी मिळण्याची ही घटना आश्चर्यकारक आहे.

आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा. जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत अशी प्रत्येक शाळा व्यवस्थापनाची इच्छा असते. मात्र त्यासाठी अशा गैरमार्गाचा वापर करणे योग्य आहे का, याचा विचार करण्याची वेळ परभणीतील घटनेने चाळाचालकांवर आणली आहे.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील महाविद्यालयात घडलेल्या या कॉपी प्रकरणाची माहिती अशी की, गेल्या मंगळवारी या शाळेत इंग्रजीचा पेपर सुरू होता. प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच तेथील शिक्षक सिद्धार्थ सोनाळे व रमेश शिंदे यांनी प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले व व्हाटसपच्या माध्यमातून जिजातामा विद्यालयातील शिक्षक गणेश जगतपाळ, महालिंगेश्वर शाळेतील शिक्षक बालाजी बुलबुले, भास्कर तिरमले यांना पाठवले. हे शिक्षक प्रश्नाची उत्तते शोधून विद्यार्थ्यांना पाठवणार होते. मात्र याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यानंतर त्यांनी या शिक्षकांसह उप केंद्रसंचालक कालिदास कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तब्बल 14 दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या