अर्थसंकल्प 2023-24

नोकरदारांना मोठा दिलासा

7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही

मोबाईल-स्मार्ट टीव्ही, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त

सोने-चांदीचे दर वधारणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या लोकसभेत 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मांडत आहेत. . 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सीताराम यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा येणार्‍या घोषणा केल्या आहेत. आयकर मर्यादेत बाबत मोठा दिलासा देणार निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. नव्या आर्थिक वर्षात 7 लाखाच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही अशी  घोषणा करत त्यांनी नोकरदारांना मोटा दिलासा आहे

याच बरोबर महिलांसाठी नवी बचत योजना, जन-धन योजनासाठी व्हिडिओ केवायसी अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

मोबाईल-स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त

कॅमेरा लेन्स, पार्ट्स आणि बॅटरीच्या आयातीवरील आयात शुल्क कमी केले जाणार आहे. याशिवाय, टीव्ही पॅनेलच्या आयात शुल्कला सुद्धा 2.5 टक्के कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाइल आणि स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. तसेच कॅमेरा लेन्स आणि बाकीच्या काही कंपोनेंट्स वर सीमा शुल्क कमी केले जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनेही स्वस्त होणार आहेत सोने-चांदीच्या दरात मात्र वाढ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या