डॉ. उमाकांत ढवळे यांना 'महाराष्ट्र रत्न' पुरस्कार

 Bapu Mulik  l  rashtra Sahyadri

सासवड : रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून गेली वीस वर्षे पेक्षा अधिक काळ, निरंतर समाजसेवा करणारे डॉक्टर उमाकांत ढवळे यांना महाराष्ट्र रत्न 2023 पुरस्कार गौरवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कामाची महाराष्ट्र बुक रेकॉर्डमध्ये ही नोंद घेण्यात आली आहे. 


 डॉ. ढवळे उमाकांत यांनी अत्याधुनिक दंतशास्त्रातील बदलांना स्वीकारून, त्यांनी आपल्या रुग्णांना कायम अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी सर्व सुविधा या रास्त दरात व वेदनाविरहित पद्धतीने देता येतील याच्याकडे त्यांचा कायम कल राहिला आहे. "दातांचे उपचार म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो" परंतु डॉ. ढवळे यांनी अशा काही उपचार पद्धती शोधून काढल्या व आत्मसात केल्या की त्यांचे रुग्ण हे कायम हसत हसतच उपचार घेतात. त्यांच्या या कार्याची दखल महासेवा या मोठ्या ऑर्गनायझेशन ने घेतली, व डॉ. ढवळे यांना मोठा प्रतिष्ठेचा असा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023 देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच 'महाराष्ट्र बुक रेकॉर्ड'मध्ये ही त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिण्यात आले. अशा ह्या आपल्या परिसरातील नागरिकांना कायम जलद, वेदनाविरहित व अत्याधुनिक उपचार कसे मिळत राहतील याच्याकडे त्यांचा सर्वाधिक कल असतो. ते स्वतः एक सर्टिफाईड एन एल पी कोच म्हणून प्रसिद्ध आहेतच. तसेच रोटरी क्लब पुरंदर येथे मेडिकल डायरेक्टर म्हणून काम पाहतात. तसेच पुरंदर मेडिकल असोसिएशन मध्ये खजिनदारपदी पदाचे काम पाहतात. म्हणून अशा पद्धतीने खूप साऱ्या सामाजिक कार्यात ते कायम अग्रेसर असतात म्हणून खऱ्या अर्थाने हे आपल्या महाराष्ट्राचे एक रत्न आहेत म्हणूनच त्याची दखल घेत, महासेवा रेड हंट व प्रवासी संदेश यांच्या ऑर्गनायझेशने आयोजित केलेल्या दि. 29 जाने. रोजी आ. घनश्याम दुबे , आ.शंकर विरकर, नगरसेवक सुधा सिंह , नगरसेवक आकाश राजपुरोहित, अध्यक्ष हिंदी अकॅडमी डॉक्टर प्रमोद पांडे अध्यक्ष बीजेपी महाराष्ट्र डॉक्टर संजय पांडे व सिने तारिका ईशा कोपिकर इत्यादी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या