श्रीरामपूरचे 'हुरडा थालीपीठ' झळकले झी मराठी वाहिनीवर!

 

आपल्या कामासोबत आपली आवड अर्थात छंद जपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आपल्या श्रीरामपूर नगरी मधल्या आपल्या भगिनी विद्याताई अरुणराव क्षिरसागर. झी मराठी वाहिनीच्या 'आम्ही सारे खवय्ये' या कार्यक्रमाने आज यांची दखल घेतली. महाराष्ट्रभर त्यांच्या गाजलेल्या बचतगट आणि सामाजिक संस्था पुरस्कृत 'हुरडा थालीपीठ' ही त्यांची रेसिपी झी टीव्हीवर दाखविली जाणार आहे. 


या कार्यक्रमाचे होस्ट संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत ३१ जानेवारी रोजी शूटिंग पूर्ण झाले. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता झी मराठी वाहिनी वर ते प्रक्षेपित केले जाणार आहे. श्रीरामपूरसारख्या एक छोट्या समजल्या जाणाऱ्या शहरातून एक स्त्री एवढ्या मोठ्या ठिकाणी गेली आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या