आ. निलेश लंके यांना भिमरत्न पुरस्कार जाहीर

६ मे रोजी होणार मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा..


पारनेर : नेहमी वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या क्षेत्रामधे चर्चेत राहीलेले पारनेरचे आ. निलेश लंके यांना अनेकदा त्यांनी केलल्या चांगल्या कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या कामाचे राज्यभर कौतुक झाले. एवढेच काय तर, विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांनी आ. लंकेंच्या कामाचे कौतुक केले. सामाजिक क्षेत्रामधे त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याबद्दल गोवंडी, मुंबई येथील भिमप्रेरणा मित्र मंडळाच्या वतीने दिला जाणारा यावर्षिचा " भिमरत्न पुरस्कार" नुकताच जाहीर झाला आहे. सोमवार दि.६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता दत्तनगर गोवंडी येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

या पुरस्कारासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष प्रवीण रणशेवरे व सचिव दिपक चौकेकर यांनी पुरस्कारासंबंधी माहीती दिली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर नावाने कोविड सेंटर उभे केले. कोरोना रुग्णांसाठी मोफत औषधोपचार व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे राज्यभरातील हजारो रुग्णांना याचा फायदा झाला. समाजात तेव्हाची परीस्थिती पाहीली तर, घरातील सदस्यही कोरोना बाधित रुग्णाजवळ जाण्यास धजावत नव्हता. अशावेळी जीवाची बाजी लावत, कर्जुले हर्या व भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये आमदार लंके यांनी स्वतः थांबून रुग्णांची सेवा केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक सेवाभावी संस्थांनी शेकडो पुरस्कारांनी सन्मानित  केले. त्याचप्रमाणे आताही भिमरत्न पुरस्काराने आमदार लंके हे मे महिन्याममे सन्मानित होणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या