माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना पुणे विद्यापीठाचा 'जीवनसाधना गौरव' पुरस्कार

अकोले : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "जिवन साधना गौरव" पुरस्कार माजी आदिवासी विकासमंञी मधुकरराव पिचड यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य भिकूजी (दादा) इदाते यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. कारभारी काळे हे होते. प्र. कुलगुरू डाॅ. संजीव सोनवणे आणि कुसचिव डाॅ. प्रुफुल्ल पवार, सुनेत्राताई पवार, माजी आमदार नंदकुमार झावरे, सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, नृत्य दिग्दर्शिका मनीषा साठे, माजी आमदार वैभवराव पिचड हे उपस्थित होते.

  माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना दिलेल्या गौरव पत्रात म्हटले आहे कि, कळसूबाईचे  शिखरयात्री, अहमदनगर जिल्ह्यातील जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ, अकोले तालुक्याचे पितामह भाग्यविधाते, माळरानावर हिरवाई फुलविणारे जलक्रांतीचे द्रष्टा नेते, तरुणांचे आधारस्तंभ, आदिवासी विकासाचे शिल्पकार, निर्मोही व्यक्तिमत्त्वाचे कर्मयोगी, पाणी, वीज, शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्राला आपल्या विधायक हस्तक्षेपाने विकाससन्मुख झळाळी देणारे सामाजिक व राजकीय कर्तृत्व ही आपल्या व्यक्तित्वाची सार्थ ओळख आहे.

आपल्यासारख्या सामाजिक व राजकीय लोकाभिमुखतेचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवनसाधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. "

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या