महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये श्रीरामपूरच्या तन्मयची निवड


श्रीरामपूर  : श्रीरामपूरचा अष्टपैलू व सलामीवीर फलंदाज तन्मय संजय गायकवाड १४ वर्षांखालील आंतरजिल्हा स्पर्धेत सेव्हन स्पोर्टस् क्लबकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे.या जोरावर त्याची बडोदा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्याच्या संघात निवडलेला तो पहिला खेळाडू आहे.


श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक या गावात जन्मलेला तन्मय आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपल्या फलंदाजीने व गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनतर्फे पुणे येथे घेण्यात आलेल्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत पुणे येथील सेव्हन स्पोर्टस् क्लबचा खेळाडू तथा रामराव आदिक पब्लिक स्कुलचा विद्यार्थी तन्मय संजय गायकवाड याने उत्कृष्ट सलामीवीराची भुमिका बजावत दर्जेदार फलंदाजी केली.आंतरजिल्हा स्पर्धेत ६ सामन्यात ८९.३८ च्या सरासरीने ७१५ धावा ठोकत उत्कृष्ट फलंदाजी केली.यासोबतच १९ बळी मिळवित अष्टपैलू प्रदर्शन केले.महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक डावामध्ये त्यांनी अर्धशतकी खेळी केली.पुणे येथे झालेल्या सराव शिबिरातील पहिल्याच सामन्यात ६ गडी बाद करत त्याने राज्य संघात आपली निवड पक्की केली.त्यास सिध्दार्थ भगत यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या निवडीचे नितीन बलराज,महेश कांबळे, हरीश बोर्डे,प्रितम शेजवळ यांनी कौतूक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या