पावणेदोन लाखांच्या मुद्देमालासह दोन दरोडेखोर जेरबंद

 डॉ. अरुण वैद्य यांच्या घरी शसस्त्र दरोडा प्रकरण...प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर : शहरातील डॉ. अरुण वैद्य यांच्या घरी शसस्त्र दरोडा घालणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने शनिवार दि. 25 रोजी जेरबंद केले असून त्यांनी 21 लाख 20 हजाराचा ऐवज चोरुन नेला होता. त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख असा मुद्देमाल हस्तगत केला.

डॉ. वैद्य यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा 25 ते 30 वयोगटातील अनोळखी 6-7 इसमांनी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला होता. त्यांची पत्नी यांना कटावणी व लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देऊन 28 तोळे वजनाचे सोने व हिर्याचे दागिने तसेच 10 लाख रुपये रोख असा 21 लाख 20 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. ही घटना दि. 15 फेबु्रवारीला घडली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोनि कटके यांना माहिती मिळाली की, डॉ. वैद्य यांच्या घरी मागील 3-4 वर्षापासून कामास असलेला आकाशसिंग जुन्नी (रा. संजयनगर, काटवन खंडोबा) याने त्याच्या साथीदारासह गुन्हा केला असून तो माळीवाडा वेस येथून पळून जाण्याच्या तयारीत आहे. कटके यांनी पोलिस पथकास कारवाईची सूचना केली.पथक तातडीने सदर ठिकाणी गेले असता, दोन संशयीत इसम दिसले. त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना एकजण गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. तर एकास ताब्यात घेतले. आकाशसिंग रघुविरसिंग जुन्नी (वय 19, रा. संजयनगर, काटवन खंडोबा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, डॉ. वैद्य यांनी त्यांच्या घरातील सामान शिफ्टींग करण्यासाठी आकाशसिंग जुन्नी यास काही लोकांना सोबत घेऊन सामान शिफ्टींग करण्याचे सांगितले होते. त्यानंतर आकाशसिंग याने त्याच्या नात्यातील सागरसिंग व इतर 5 ते 6 लोकांना सोबत घेऊन डॉक्टरांच्या घरातील सामान शिफ्ट करुन दिले होते. त्यावेळी डॉक्टरांच्या पत्नी यांना घरातील सोन्याचे व हिर्याचे दागिने तसेच रोख रक्कम सुटकेसमध्ये भरताना पाहिले होते.

याबाबत आकाशसिंग व सागरसिंग यांनी त्यांच्या नात्यातील करणसिंग टाक (रा. आष्टी, जि. बीड)    यास माहिती दिली. त्यावरून करणसिंग याने त्याच्या 5-6 साथीदारांना व सागरसिंग यांना सोबत घेऊन डॉक्टरांच्या घरी दरोडा टाकल्याची हकिगत सांगितली. चोरी केलेले सोने व हिर्याचे दागिने, रोख रकमेबाबत विचारपूस केली असता, त्याने सागरसिंग याच्याकडे गुन्ह्यातील सोने व रोख रक्कम असल्याची माहिती दिली. दरम्यान, गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागरसिंग जुन्नी हा नगर येथे लग्न समारंभाकरीता आला असून काटवन खंडोबा येथील म्हसणवाटा येथे लपून बसलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने पोनि कटके यांनी पोलिस पथकास कारवाईची सूचना केली.  पथकाने वेशांतर करुन काटवन खंडोबा येथील म्हसणवाटा येथे जाऊन झाडाखाली बसलेल्या इसमास शिताफीने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव सागरसिंग बलविरसिंग जुन्नी (वय 23, रा. संजयनगर, काटवन खंडोबा) असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या