तळेगाव ढमढेरेत शेतकऱ्यांचा विद्युत वितरणवर मोर्चा

तळेगाव ढमढेरे : (ता.शिरुर) परिसरात विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असून काही ठिकाणी विद्युत रोहित्रच बंद केले जात असल्याने आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढून विद्युत वितरण विभागाचा निषेध नोंदवला आहे.


तळेगाव ढमढेरे ता. शिरुरसह परिसरात विद्युत वितरण विभागाकडून शेतकऱ्यांच्या वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्या अभावी जाळून चालली असून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने नुकतेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता.  यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, सोपान गवारे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण भुजबळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदीप गुंदेचा, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कैलास नरके, राजेंद्र घुमे, बंडोबा जेधे, रमेश भुजबळ, किरण शिंदे, पोपट ढमढेरे, अक्षय ढमढेरे, विकास भुजबळ, राजेंद्र तोडकर, पोलीस पाटील पांडुरंग नरके यांसह आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन विद्युत वितरण विभागाने कट करु नये आणि खंडित केलेले वीज कनेक्शन पुन्हा सुरु करावे तसेच शेतकऱ्यांच्या बिलावर येणारी कृषीपंपाची वाढीव एच पी कमी करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली असून याबाबत विद्युत वितरण विभागाचे तळेगाव ढमढेरे विभागाचे शाखाधिकारी दादा बारवकर यांना निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या