पहाटेच्या शपथविधला शरद पवारांची संमती!

देवेंद्र  फडणवीस यांचा गौप्यस्फोट

    मुंबई: अजित पवार यांनी आपल्याबरोबर घेतलेली शपथ फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती असे सांगतानाच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही तासांच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती असा सनसनाटी गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला त्यांच्या या व्यक्तव्यवरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे ठरल्यानंतर राष्ट्रवादीत काय स्ट्रॅटेजी बदलल्याअजित पवार कसे तोंडघशी पडले हे ते सांगतील. त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन”असे सांगेलाही फडणवीस विसरले नाहीत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर अनेक गौप्यस्फोट केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकीय नाट्य बघायला मिळालं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. विशेष म्हणजे त्यावेळी तयार झालेलं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही तासांच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होतीअसे  फडणवीस यांनी सांगितले . याशिवाय त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारत भाजपसोबत सरकार स्थापन केलेलं. पण अजित पवार यांचं ते बंड होतं काअसा सवाल  देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

“पहाटेच्या शपथविधीच्यावेळी अजित पवार यांचं बंड होतं काइथूनच सुरुवात होईल. त्यांनी माझ्यासोबत शपथ घेतली होती. त्यामुळे काही पथ्य मीसुद्धा पाळली पाहिजेत. त्यामुळे काही कमेंट त्यांना करुद्या. त्यानंतर उर्वरित कमेंट मी करतो”असे फडणवीस यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या