पुणे पंढरपूर पालखी महामार्गाला वनखात्याची परवानगी


 दिवे : पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचे काम गेले कित्येक वर्षे रखडले होते  बारामती लोकसभा मतदार संघातून जाणारा हडपसर ते लोणंद हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग नुकताच राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्यानंतर  या कामाला मंजूरी मिळाली त्यातील झेंडेवाडी ता:पुरंदर ते लोणंद या कामाची निविदा निघून कामाला सुरूवात देखील झाली आहे.

परंतु हडपसर ते झेंडेवाडी हा मार्ग दिवे घाट पट्ट्यातील भाग वनविभागाच्या हद्दीतील असल्याने वन विभागाची परवानगी नसल्याने अपूर्ण होता. या परवानगीसाठी पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे यांनी  आदरणीय पवार साहेब व खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या माध्यमातून  नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. व वनविभागाने देखील या रस्त्याच्या कामासाठी परवानगी दिली आहे.

या चौपदरीकरणाच्या कामासाठी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आणि फुरसुंगी रेल्वे लाईनवर रेल्वे ओव्हर ब्रीज बांधण्यात येणार असून वडकी व उरळी देवाची रस्त्याच्या  प्रवेशद्वाराजवळ अंडरपास आणि मंतरवाडी चौकात तसेच एसपी इन्फोसिटी सेंटरसमोर  फ्लायओव्हर उभारण्यात येणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले. या कामाच्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे ऑफिसकडून दिल्लीला निविदेसाठी आवश्यक कागदपत्रे गेली असून 27 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर-हवेलीचे नेते संभाजीराव झेंडे यांनी सांगली जिल्ह्यातील गुरूमवाडी ता:पलूस येथे आदरणीय पवार साहेब व केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची एकत्रित भेट घेतली व या  कामासंदर्भातील प्रक्रिया लवकर करण्याची विनंती केली. यावेळी गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रस्त्याचे हे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्यावरील वाहतूकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे  या चौपदरीकरणाच्या कामात मुख्य रस्ता डांबरीकरण फुरसुंगी रेल्वे लाईनवर ओव्हर ब्रीज वडकि व उरूळि येथे अंडरपास तसेच मंतरवाडि व एस.पी.इनफोसिटि येथे ओव्हर ब्रीज होणार आहे त्यामुळे येथील वाहतूक कोंडी कमी होणार आहे

तर दुसरीकडे रिंगरोडच्या कामाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असून दिवे घाट व बोपदेव घाट हे पुणे शहराला जोडणारे मुख्य रस्ते आहेत या मार्गा व्यतिरिक्त भिवरि पठारवाडी गोगलवाडी हा रस्ता माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सुचविला होता खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत याहि रस्त्याला मंजुरी मिळाली असून लवकरच याहि कामाला सुरुवात होणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले या रस्त्यामुळे मुंबईला जाणारी वाहने नविन बोगद्यातून थेट नवले पुलावर जातील त्यामुळे कोंढवा कात्रज रस्त्यावरील वाहतूकिचा ताण कमी होणार आहे तसेच गोगलवाडि परिसरातील शेतकरयांना आपला माल अवघ्या अर्ध्या तासात सासवड व दिवे येथील बाजारात विक्रीसाठी आणता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या