नगर जिल्ह्यातील ८८१ अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी सेविका रिक्त
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नगर राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 2017 पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची 20 हजार 601 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचे आदेश राज्य सरकारच्या एकात्मिक बालविकास विभागाने काढले आहेत. या पदांची भरती 2023 च्या 31 मे पूर्वी होणार आहे.
त्यानुसार नगर जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाने हालचाली सुरू केल्या असून जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 882 अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
अंगणवाड्यांचा विकास करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार लक्ष घातलेले आहे. त्याच पार्श्वभुमीवर राज्यात अंगणवाडीमधील 20 हजार 601 जूनी रिक्त पदे भरली जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, उच्च शिक्षणही ग्राह्य धरले जाईल. त्याप्रमाणे किमान वयोमर्यादा ही 35 वर्षे असणं अनिवार्य आहे.
0 टिप्पण्या