एक पुस्तक, कैदी वाचनालयासाठी....

कैद्यांमधील "माणूस " घडविण्यासाठी घुगेचां पुढाकार



अकोले : अकोले पोलिस स्टेशनमधील कैद्यांसाठी  पोलीस स्टेशनच्या वतीने वाचनालयाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते करण्यात आले.एक पुस्तक माणसाचं आयुष्य बदलू शकतं असं म्हणतात. म्हणूनच हे विशेष वाचनालय खास कैद्यांसाठी सुरू केलेले आहे.
यावेळी तहसीलदार सतीश थिटे,पोलीस निरीक्षक मिथुन घुगे,रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष डॉ. रविंद्र डावरे, उपाध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी सुनील नवले,खजिनदार रोहिदास जाधव,मार्गदर्शक ऍड .बी.जी. वैद्य,माजी अध्यक्ष सचिन देशमुख, सचिन आवारी, माजी सेक्रेटरी प्रा. डॉ.सुरींदर वावळे,सदस्य सुधीर फरगडे, राजेश पाडेकर, सर्व पोलीस पाटील, पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
      या सामाजिक उपक्रमात आपलाही सहभाग हवा आहे ही भावना नेहमीच रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या सदस्यांनी जपली आहे. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या  संकल्पनेला व आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या संग्रहातील, आपल्या घरातील असं एखादं पुस्तक आपण या वाचनालयासाठी भेट द्यावं ज्यायोगे कैद्याच्या आयुष्यात बदल घडण्यास आपणही हातभार लावावा या हेतूने आज या वाचनालयास जवळपास ७० पुस्तके  व एक कपाट भेट दिले. तसेच अजून वरिष्ठ कार्यालयाशी संवाद साधून ५० हजार रुपयांची पुस्तके भेट देण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना जेष्ठ सदस्य विधिज्ञ बी.जी.वैद्य यांनी यावेळी व्यक्त केली. पुस्तकामुळे मत, मन परीवर्तन होऊन जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. कैद्यांमध्ये एक वेगळी भावना तयार झालेली असते. रिकामे डोके, शैतानाचे घर असते. त्यामुळे कैद्यांचा वेळ चांगल्या कामासाठी लागल्यास त्यांच्यात सकारात्मकता तयार होईल या दृष्टीने या पोलीस स्टेशनच्या आवारात या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
 यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी हा उपक्रम महत्वाचा असून यामुळे कैद्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल असे मत व्यक्त केले.
   या उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन यथाशक्ती पुस्तकरूपी भेट आपल्या कैदी वाचनालयासाठी द्यावी असे आवाहन अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या