आरोग्य, शिक्षणासाठी तडजोड नाही...

तिडी येथील सांस्कृतिक कार्यक्रमात खा. इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन 


वैजापूर : चांगले शिक्षण व आरोग्याच्या विषयावर मी कधीच तडजोड करत नाही तसेच कुणाला करूही देत नाही. परंतु, आजही जिल्हा परिषद शाळेची अवस्था बघितली तर मन अस्वस्थ करणारी चित्र बघायला मिळत आहे. कारण तब्बल १ हजार ६०० वर्गखोल्या आपल्या जिल्ह्यात पत्र्याच्या आहे. हे आकडे नुकतेच झालेल्या सर्व्हेनुसार समोर आले. त्यामुळे या सर्व शाळांवरील पत्रे जोपर्यंत काढून त्या ठिकाणी आरसीसी मध्ये बांधकाम होत नाही. तोपर्यंत मी सरकारकडे पाठपुरावा सुरुच राहील, असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला सर्व पक्षातिल नेतेमंडळीची उपस्थिती होती.यावेळी आमदार रमेश बोरणारे,भाजपचे अल्पसंख्यक जिल्हाअध्यक्ष नबी पटेल, शिंदे गटाचे शहराध्यक्ष पारस घाटे, एमआयएमचे तालुका अध्यक्ष अकील कुरैशी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जलील म्हणाले,चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे खासदार, आमदार व अधिकारी यांची सयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्यातिल विविध कामांची यादी सादर करत शैक्षणिक कामासाठी १८ कोटी निधीची मांगनी केली.परंतु हा निधी शैक्षणिक कार्यसाठी पुरेसा नसल्याने मी त्याचा विरोध करून फडणवीस साहेबाना विनंती केली.बाकीच्या ज्या काही योजना असतील त्यांना निधी कमी द्या मात्र जिल्हा परिषद शाळेला निधी वाढवून देण्याची मांगनी केल्याचे जलील यांनी सांगितले.यावेळी सर्व पक्षातिल मान्यवरसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या