मृगाचे पाणी चार खंडात पडणार...
सासवड:-
कोरोनाकाळानंतर होत असलेल्या पहिल्या श्रीक्षेत्र वीर येथील यात्रेत भाविकांचा प्रचंड उत्साह अनुभवास येत आहे. गुलालखोबऱ्याची उधळण करीत संपूर्ण मंदिर परिसर नाथांच्या जयघोषात न्हाऊन गेला होता.
आज पंचमी शुक्रवार दि. १० रोजी पहाटे स. ४ वाजता देवाची पूजा करून मानकऱ्यामार्फत देवाला पोशाख करण्यात आला. दुपारी सर्व काठ्या पालख्या देऊळवाड्यात आल्या. आरती होऊन छबिण्याला सुरुवात झाली. एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर देवाचे मानकरी तात्यासो बुरुंगले यांच्या अंगात संचार येऊन वार्षिक पीकपाणी, भविष्यवाणी (भाकणूक) सांगण्यात आली.
त्यानुसार यावर्षी मृगाचे पाणी चार खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल. हत्तीचे पाणी चार खंडात जनतेचे समाधान होईल. बाजरी पीक चांगले, उतरा,पूर्वा, तीन खंडात पडेल, चौथ्या खंडात साधारण राहील. गाई गुरे रोगराई हटली आहे, मनुष्याच्या मागे साधारण राहील. अशाप्रकारे भाकणूक झाल्यानंतर दोन सर्व पालख्यासोबत दोन प्रदक्षिणा होऊन काठ्या-पालख्या आपापल्या पालखीतळावर मार्गस्थ झाल्या. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे चेअरमन संतोष प्रल्हाद धुमाळ ,व्हा. चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्थ हनुमंत धुमाळ, अभिजित धुमाळ, अमोल धुमाळ, नामदेव जाधव, दत्तात्रय समगीर, संजय कापरे, राजेंद्र कुरपड, सल्लागार ट्रस्ट तर्फे व्यवस्था पहिली.
0 टिप्पण्या