मात्र निर्णय राखीव
मुबंई : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयात चांगलेच युक्तिवाद पाहायला मिळाले. दोन्ही गटाच्या वकिलांकडून देशात यापूर्वी घडलेल्या विविध खटल्यांचा उल्लेख केला जात आहे. यामध्ये किहोतो आणि नबाम रेबिया या दोन खटल्यांचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. दोन्ही गटाकडून या खटल्यांचे वेगवेगळे आणि आपापल्या सोयीचे अर्थ काढले जात आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा खटला आणखी किचकट बनत चालला आहे.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. यावर लवकरच न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. अशी एकंदरीत परिस्थिती असताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी नबाम रेबिया आणि किहोतो खटल्यांबाबत मोठं विधान केलं आहे. दोन्ही खटले महाराष्ट्राच्या दृष्टीने गैरलागू असल्याचं विधान बापट यांनी केलं आहे.
उल्हास बापट म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत सातत्याने किहोतो खटला आणि नबाम रेबिया खटल्याचा दाखला दिला जात आहे. पण किहोतो खटला, नबाम रेबिया आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष… या तिनही खटल्यांचे तपशील खूप वेगळे आहेत. आपल्या सोयीचा अर्थ प्रत्येक पक्षाकडून काढला जात आहे.”
0 टिप्पण्या