वंदे भारत’ एक्सप्रेस : आस्था आणि विकासाचे प्रतिक

मुंबई- शिर्डी साईनगर, मुंबई-सोलापूर वंदे भारत’ एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा




मुंबई : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या आस्थेचे आणि विकासाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैशंव, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व रवींद्र चव्हाण  उपस्थित होते.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तसेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला ते कुर्ला व एमटीएनएल ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गाचे आणि मालाडमधील कुरार गाव भुयारी मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

 याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेकेंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेकेंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलविधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरसार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणआमदार प्रविण दरेकरआमदार आशिष शेलारआमदार राम कदम यांच्यासह लोकप्रतिनिधीसंबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   मोदी म्हणाले की, भारतातील रेल्वे वाहतूक ही आपल्या प्रगतीची जीवनरेखा आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. आजपासून सुरु करण्यात आलेल्या दोन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठीविशेष करुन मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी खूप महत्वाचा दिवस आहे.

मुंबई मध्ये पूर्व - पश्चिम उपनगरांना जोडणारे प्रकल्प सुरू केल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होणार आहे. रेल्वेनवीन विमानतळ आणि बंदरे विकसित करण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय महामार्ग बनवले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तर रेल्वे साठी अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय जनतेसाठी विशेष लाभ देण्यात आला आहे. आयकर मर्यादा ५ लाख रुपयांवरुन ७ लाख रुपयांपर्यंत वाढविली असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मुंबई आणि पुणे यासह अनेक शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याने याचा फायदा व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, सामान्य नागरिकांना होणार आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने वंदे भारत वर रचलेल्या संस्कृत कवितेचे मोदींनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या