महिला परिचारिकेशी असभ्य वर्तन, तहसीलदार विजय बोरुडेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

कोपरगाव तहसील कार्यालयाचे दंडाधिकारी विजय बोरुडे यांनी आपल्या वर्तनाने कहर केला असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अचानक प्रवेश करून तेथील दरवाजा जोरजोराने ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने कोपरगाव शहरासह जिल्हयात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परिचारिकेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे तपास करत आहेत दरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील हा 'राडा' तेथील अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ लोकप्रतिनिधी, वरिष्ठ महुसल अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे समजते. कोपरगाव येथे तहसीलदार यांनी कर्मचारी व अधिकारी यांच्याशी केलेल्या अपमानास्पद वागणूक व शिवीगाळ बाबत सर्व कर्मचारी संघटना व लिपीक हक्क परिषद तसेच मध्यवर्ती संघटना यांचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांनी अहमदनगर येथे निषेध केला व संबधित तहसीलदार यांच्यावर कार्यवाही न झाल्यास सोमवार पासून सर्व कर्मचारी कामबंद करणार असल्याचे सांगण्यात आले आहे चक्क महसुल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडली असून त्यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच संबंधित तहसीलदार बोरुडे यांच्या वर काय कारवाई वरिष्ठ करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या