काळजाचा ठोका चुकवणार्‍या कसोटीत न्यूझीलंडचा विजय

इंग्लंडचा एका धावेने पराभव, वॅगनर, साऊदी, हेन्री यांची दमदार गोलंदाजी

वेलिंग्टन ः काळजाचा ठोका चुकविणार्‍या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना न्यूझीलंडने केवळ एका धावेने जिंकला. विशेष म्हणजे पहिल्या डावात न्यूजीलंडला फॉलोऑनची नामुष्की पत्करावी लागली होती. मात्र दुसर्‍या डावात त्यांच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत इंग्लंडला जिंकण्यासाठी 257 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम साऊदी, नील वॅगनर व मॅट हेन्री यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंडला हे आव्हान पेलता आले नाही. त्यांचे सर्व गडी 256 धावांवर बाद झाले. त्यामुळे केवळ एका धावेने न्यूझीलंड विजयी झाले.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत 8 गडी गमावून 435 धावांचो डोंगर उभा केला व डाव घोषित केला होता. प्रत्युतरादाखल फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंड संघाला सर्व गड्यांच्या मोबदल्या फक्त 209 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनच नामुष्की ओढवली. फॉलोऑननंतर मात्र अत्यानंतर इंग्लंडकडून फॉलोऑन घेत न्यूझीलंड फलंदाजांनी  प्रयत्नांची पराकाष्टा करत सर्व गडी483 धावा कुटल्या व इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले.

इंग्लडच्या दुसर्‍या डावात जॅक क्रऊले व बेन डकेट यांनी संथ सुरूवात केली होती. संघाच्या 39 धावा झाल्या असताना साऊदीने क्राऊलेला बाद केले. त्यानंतर नियमित अंतराने न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लडंचे गडी बाद करण्यात यश मिळवले. एका बाजूने इंग्लंडचे फलंदाज बाद होत असल्याने न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जो रूय हा न्यूझीलंडच्या विजयाचा मार्गात पाय रोवून उभा होता. त्याने एकाकी झुंज देत 95 धावांची खेळी केली. मात्र इंग्लंडला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. रूट बाद झाल्यानंतर बेन फोक्सने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. साऊदीने त्याला बाद करून न्यूझीलंडच्या विजयातील अडसर दूर केला. इंग्लंडचे सर्व गडी 256 धावांवर बाद झाल्याने जिंकण्यासाठी त्यांना केवळ एक धाव कमी पडली.

न्यूझीलंडकडून दुसर्‍या डावात वॅगनर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने चार गडी बाद केले, तर साऊदीने 3 तर हेन्रीने 2 गडी बाद करून त्याला सुरेख साथ दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या