Breaking News

अबॅकसमध्ये सहा वर्षाची राजनंदिनी देशात तिसरी

बारामती : १५ वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा ठाणे मुंबई या ठिकाणी संपन्न झाली. यामध्ये विद्या प्रतिष्ठान डॉ. सायरस पुनावाला शाळेची इयत्ता पहिली मधील विद्यार्थिनी राजनंदिनी हर्षवर्धन शिंदे हिने देशात तिसरा क्रमांक मिळवून ग्रामीण भागातील व पहिल्या प्रयत्नात यश मिळवणारी विद्यार्थिनी म्हणून शाबासकी सुद्धा मिळवली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धे मध्ये देशातील २५०० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.देशाच्या विविध भागात परीक्षेच्या  फेऱ्या घेण्यात आल्या होत्या अंतिम फेरी डॉ काशिनाथ घाणेकर नृत्यालय ठाणे येथे घेण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ अरुण सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिस समारंभ संपन्न झाला.

गणित विषयात १०० समीकरणे ५ मिनिटात सोडवून ६ वर्षाच्या राजनंदिनी हिने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तिला अबॅकसच्या शिक्षिका भाग्यश्री जगताप व तिचे आईवडील यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments