अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे बेमुदत काम बंद आंदोलन.. अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-आ.निलेश लंके
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांटे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर यापूर्वीसुध्दा आंदोलने केली आहेत.परंतु त्यांना म्हणावे असे यश न मिळाल्यामुळे तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी २० फेब्रुवारी २०२३ पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. तसे निवेदन शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना दिले आहे.यावेळी बोलताना आमदार लंके म्हणाले,माझ्या माता भगिनींची होणारी ससेहोलपट मी आजवर पहात आलो आहे. शासनाकडुन मिळत असलेल्या मानधनात स्वत:चे कुटूंब चालवनेही आवघड झालेले आसताना त्यांना आता मानधना ऐवजी वेतन मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील राहु असे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी या सेविकांना दिले .
सध्या महाराष्ट्रामधे २ लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपल्या मागण्यांसाठी संप करण्याची वेळ यावी ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे.सन २०१७ सालामधे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधनामधे वाढ दिली गेली. त्यानंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढत गेली. परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मासिक उत्पन्नात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस महागाईमुळे हवालदिल झाल्या आहेत. अशा परीस्थितीत शासनाने त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत् केला नाही, त्यामुळेच त्यांच्यावर संप करण्याची वेळ आली आहे.असे सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . नाईलाजाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला बेमुदत संपाची घोषणा करावी लागली.तसे पाहीले तर,अंगणवाडी सेविका मदतनीस या कामगार आहेत असे सर्वोच्च न्यायालायाने नमूद केले आहे. तरीसीध्दा सरकारने याची दाखल घेऊन त्यांना कर्मचारी म्हणून जाहीर केले नाही.सरकारने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कर्मचारी घोषित करावे अशी अनेक वर्षाची मागणी आहे. अंगणवाडी सेविकांना सुमारे ८५०० मिनी अंगणवाडी सेविकांना ६५००/- तर मदतनीस यांना ४५००/- रुपये मासिक मानधन दिले जाते ते अतिशय तुटपुंजे आहे. त्या मानधनात तत्काळ भरीव वाढ करावी व कृती समितीशी वेतनश्रेणी विषयी चर्चा करावी. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना निवृत्ती वेळी मासिक मिळकतीच्या निम्मी पेन्शन मिळावी, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुप्रीम कोर्ट निर्णया प्रमाणे ग्रॅज्युटी द्यावी, इंधनाचे दर वाढल्याने मुलांना पोषण आहार देण्यासाठीच्या दरात वाढ होणे आवश्यक आहे.तसेच चांगला ताजा सकस आहार मिळाला पाहिजे, ऑनलाईन कामांसाठी चांगले दर्जाचे मोबाईल देणे तसेच पोषण ट्रॅकर अॅप मराठीत असले पाहिजे. अशा महत्वाच्या मागण्या कृती समितीने केल्या आहेत.
आपण या मागण्यांना पाठींबा द्यावा व विधान सभेत या मागण्या बाबत प्रश्न उपस्थित करून आवाज उठवावा अशी विनंती आपल्या निवेदनात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी केली आहे.
तसेच २८ फेब्रुवारी पासून महाराष्ट्र भरातील अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदान, मुंबई येथे विधानसभा कार्यरत असेल अशा प्रत्येक दिवशी मुक्कामी आंदोलन करणार आहेत. त्यावेळी आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करावे अशी विनंतीही यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश लंके यांना केली आहे.
यावेळी अंगणवाडी सेविका संघटनेच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष नंदा पाचपुते , तालुका प्रतिनिधी अलका नगरे,तालुका अध्यक्ष संगीता विश्वास तालुका उपाध्यक्ष शशिकला औटी , तालुका प्रतीनिधी कल्पना चौरे ,तालुका कार्याध्यक्ष अरुणा खळेकर माया मिसाळ यांच्यासह आंगणवाडी सेविका मदतनीस व संघटनेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या .
0 टिप्पण्या