उद्याचं पुढील भूमिका स्पष्ट करणार : सत्यजीत तांबे


संगमनेर : सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं आहे. मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिलं,” अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे  यांनी दिली. राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. निकाल लागल्यानंतर तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. दरम्यान 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली.

या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी जनतेचे आभार मानले. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल असेही तांबे म्हणाले. मतदान बाद होण्याचं प्रमाण मोठं आहे. बाद मतदानामुळे माझे मताधिक्य कमी झाल्याचेही तांबे यावेळी म्हणाले. या निवडणुकीची प्रक्रिया क्लिष्ट असल्याचेही ते म्हणाले.
नाशिक पदवीधर निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अनेक लोकांकडून अभिनंदनाचे फोन आले. त्या सर्वांचे सत्यजीत तांबे यांनी आभार मानले. या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिल्याचे तांबे म्हणाले. मी लोकांना प्रेम दिलं आहे, पैसे वाटले नाहीत. मी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असेही सत्यजीत तांबे यावेळी म्हणाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. सत्यजीत तांबेंना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेंमुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला. युवा नेतृत्व, गेल्या अनेक वर्षांपासूनची संघटनात्मक बांधणी, वडील सुधीर तांबे यांनी मागील तीन पंचवार्षिक बांधलेला मतदारसंघ, सत्यजीत तांबे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत काम करत आहेत. जवळपास वीस वर्षांपासून त्यांनी मतदारसंघामध्ये जोरदार अशी मोर्चेबांधणी केली आहे. या सगळ्यांचा सत्यजीत तांबे यांच्या विजयात मोठा वाटा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या