अधिकाऱ्याच्या मुलीचे ७३ लाख हडपले तपास अधिकाऱ्यावर ताशेरे

 अधिकाऱ्याच्या मुलीचे ७३ लाख हडपले

तपास अधिकाऱ्यावर ताशेरे
श्रीरामपूर:कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याच्या मुलीच्या नावावरील 73 लाख 50 हजार रुपये तिच्या आजी-आजोबांनीच हडपले, काका पोलीस खात्यात असल्याने या प्रकरणातील तपास निष्काळजीपणे होत असल्याच्या नाराजीतून औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका करते तर्फे अँड. राहुल तांबे हे काम बघत आहे.
सुनावणी वेळी न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई व न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी संबंधित प्रकार तपास अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे ताशेरे उडत शपथपत्राद्वारे सविस्तर खुलासा करण्याच्या आदेश दिले आहेत.
याप्रकरणी किनवट तालुक्यातील मांडवी गावाजवळील निराळा तांडा येथील संजीवनी सुधीर चव्हाण यांनी अँड. राहुल तांबे यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली आहे, याचिकेनुसार त्यांचे पती सुधीर चव्हाण हे महा आयटी प्रकल्पांतर्गत मुंबईला मंत्रालय प्रकल्प व्यवस्थापक होते. 15 जून 2021 रोजी त्यांचे कोरोनामुळे निधन झाले, त्यांनी मृत्यूपूर्वी काढलेल्या जीवन विम्याचे 51% समभाग पत्नीच्या नावे आणि 41 टक्के त्यांच्या मुलीच्या नावे केले होते त्यानुसार संजीवनी यांना 76 लाख 50 हजार तर मुलीला 73 लाख 50 हजार मिळणार होते. संजीवनी यांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा झाली मात्र ही नात संज्ञान नसल्यामुळे तिच्या नावावरील रक्कम सुधीर यांच्या आई सिंधुताई चव्हाण यांच्या खात्यात विमा कंपनीने घोषणापत्र घेऊन जमा केले. 73 लाख 50 हजार जमा झाल्यानंतर संजीवनी यांचा छळ सुरू झाला, त्यामुळे संजीवनी यांनी सासू-सासरे, दीर , चुलत सासरे यांच्या विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र दीर पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या विरोधातील तक्रारीचा पोलीस योग्यरितीने तपास करत नसल्याच्या नाराजीतून खंडपीठात धाव घेतल्याचे संजीवनी यांनी फौजदारी याचिकेत म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या