गुहा येथील धार्मिक स्थळावरून झालेल्या वादावर सध्यातरी तोडगा !

जिल्हाधिकारी व दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक!





राहुरी शहर प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील गुहा येथे काही दिवसापासून चालू असलेल्या धार्मिक स्थळाबाबत  दोन समाजाच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मध्यस्थीने शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येऊन या वादावर सध्या तरी तोडगा निघाल्याचे दिसत असून दोन्हीही समाजांनी होणारा यात्रोत्सव शांतता राखून उत्साहात साजरा करावा असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दोन्हीही समाजाला आवाहन केले आहे
गुहा येथील दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीं सह राहुरीतील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली या बैठकीस अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला प्रांत अधिकारी अनिल पवार श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यावेळी या बैठकीस हजर होते
बैठक घेण्याच्या तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रत्यक्ष गुहा येथे जाऊन त्या धार्मिक स्थळाची पाहणी केली व त्यामध्ये धार्मिक स्थळावर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे इथून काढण्यात येणार नाही व त्या ठिकाणी असलेले धार्मिक फलक त्या स्थळावरून काढून टाकण्याची व प्रार्थने वरून वाद नकोत  अशा सर्व सूचना मांडून त्या एकमताने अमलात आणण्याचे ठरविले 
दरम्यान मार्च महिन्यात येणाऱ्या या यात्रोत्सवात दोन्हीही समाजांनी भाग घेऊन यात्रेसाठी दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी केली व कुठलेही नवीन बदल करू नये व जमिनीच्या वादावर न्यायालयात तोडगा काढावा व त्या संदर्भात कोणीही वाद वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा भरदार उघडल्या जाणार असल्याचा सुचक इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी यावेळी बैठकीत सर्वानुमते दिला आहे 

---------------------

गुहा येथील धार्मिक स्थळाच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल व त्यानंतर गावातील शांतता व धार्मिक महोत्सव शांततेत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व येथून पुढे होणाऱ्या धार्मिक वादाला जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही -
डॉ. राजेंद्र भोसले,

 जिल्हाधिकारी ,अहमदनगर 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या