तलाठी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत हासे

 श्रीरामपूर: अहमदनगर जिल्हा तलाठी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत हासे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

अहमदनगर जिल्हा तलाठी संघटनेची कार्यकारणीची बैठक शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली,  मावळते जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी कार्याध्यक्षपदी सोपान गायकवाड, सचिव पदी महेश सुद्रिक यांची निवड करण्यात आली, प्रशांत हासे हे संगमनेर तलाठी संघटनेचे माजीतालुकाध्यक्ष असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, त्यांच्या निवडीबद्दल संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे तहसीलदार अमोल निकम मंडळ अधिकारी कैलास खाडे यांच्यासह अधिकारी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या