मुलीची छेडछाड प्रकरणी ग्रामस्थांकडून
आरोपी तरुणासह आई वडिलांवर गाव बंदीचा ठराव
वडाळा महादेव
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे मुलीची शाळा प्रकरणी ग्रामस्थांकडून विशेष सभा घेण्यात आली यात आरोपी तरुणासह आई-वडिलांवर गाव बंदीचा ठराव करण्यात आला आहे. अशी ठराव करणारी ही पहिलीच ग्रामसभा ठरली.
वडाळा महादेव येथील शालेय विद्यार्थिनी शाळेतून घरी जाताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाने या अल्पवयीन विद्यार्थिनीचा हाथ पकडुन विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने घटनेची माहिती आई वडील नातेवाईक यांना दिली.
या प्रकारावर चिडलेल्या संतप्त मुलीच्या वडिलांसह गावातील नातेवाईक गुन्हेगार तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु आक्रमक झालेले ग्रामस्थ पाहून तरुण गाव सोडून फरार झाला होता. घडलेल्या या घटनेची श्रामपूर पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान अल्पवयीन मुलगी घाबरलेली असल्यामुळे आज दिनांक सात रोजी वडाळा महादेव येथे ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते या ग्रामसभेत, सदरच्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणाविषयी व त्याच्या आईवडिलांविरुद्ध गाव बंदीचा ठराव घेण्यात आला.
सदरचा तरुण हा गुन्हेगारी स्वरूपाचा असून यापूर्वी या तरुणाने औरंगाबाद अहमदनगर ठाणे अशा विविध जिल्ह्यांमध्ये विविध स्वरूपाचे गुन्हे करून हा तरुण वडाळा महादेव येथील राहत्या घरी आश्रयास येत असे सदरच्या तरुणाने घर फोडी रस्ता लूट अशा विविध स्वरूपात चोऱ्या मार्या केल्या आहेत याबद्दल त्याच्या आई-वडिलांनाही ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडूनही वेळोवेळी माहिती देऊ न ही सदरचा तरुण सुधारण्याच्या मनस्थितीत नसल्याने यावर ग्रामपंचायत प्रशासन वडाळा महादेव यांच्याकडून गाव बंदीचा ठराव करण्यात येत आहे यामध्ये त्याच्या कुटुंबीयांनाही गाव बंदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
या ग्रामसभेत सरपंच उपसरपंच कामगार पोलीस पाटील मुख्याध्यापक शिक्षक वृंद विविध संघटनेचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण कन्हेरकर यांनी शाळा भरते व सुटते वेळी ओढ्याच्या जवळपास आमचे दोन शिक्षक उपस्थित राहतील तसेच शाळा सुटल्यानंतर प्रथम मुलींना सोडण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी सरपंच कृष्णा पवार, सचिन पवार, कैलास पवार, अविनाश पवार, भरत पवार, दादा झिंज, संतोष कुदळे, माणिक पवार, विनोद मलिक, संजय कसार, उत्तमराव पवार, सि वाय पवार, लक्ष्मण पवार, वेडु पवार, अशोकराव गायकवाड, पांडुरंग सातपुते, नाना भोंडगे, बाप्पू कसबे, सोमनाथ भोंडगे, कडुबाई कसबे, ताराबाई भोंडगे, लहानबाई भोंडगे, शारदा कसबे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक किरण पवार, पो कॉ तुषार गायकवाड, प्रविण कांबळे लहुजी शक्ती सेनेचे तसेच अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आक्रमक ग्रामस्थ यांना शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेणे योग्य आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच आई वडिलांनी शाळेतील आपल्या मुलांना मोबाईल देऊ नये व आपली मुलगी व मुलगा काय करतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.पोलीस नाईककिरण पवार -
0 टिप्पण्या