नरेंद्र मोदी हाय हाय च्या घोषणांनी चर्चगेट दणाणले
मुंबई : मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज प्रीती मेनन आणि अपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली, चर्च गेट ते भाजपा कार्यालय असे आंदोलन सुरु केलेल्या या आंदोलन समयी संतप्त आप चे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.धक्काबुक्की झाली.
आंदोलनाला परवानगी नाही या कारणास्तव पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अखेरीस ताब्यात घेतले. नरेंद्र मोदी हाय हाय च्या घोषणांनी यावेळी चर्चगेट चा परिसर दणाणून गेला. इडी, सीबीआय, पोलीस यांच्यामार्फत भाजपा तानाशाही राबवू आहात असल्याचा आरोप यावेळी प्रीती मेनन यांनी केला. सिसोदिया यांच्या घरी, कार्यालयात, त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापे मारूनही एक हि रुपया बेहिशेबी मिळालेला नाही तरीही देशातील सर्वोत्तम शिक्षण मंत्री असलेल्या सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. मोदी अशा प्रकारे विरोधकांना दाबून ठेऊन देशात अघोषित तानाशाही अंत असल्याचा आरोप त्यांनी केला.
0 टिप्पण्या