'नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत'

 जयंत पाटील यांचे सूचक ट्विट 






मुंबई : महापुरूषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करून महाराष्ट्रातील जनतेच्या टीकेचे धनी ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पदाचा देवू केलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी स्वीकारला आहे, महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर आपली भूमिका ट्वीट करत स्पष्ट केली आहे. 


महापुरूषांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करीत असल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात विरोधी पक्षासह राज्यातील जनतेने उत्स्फुर्त  आंदोलने केली होती तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या १२ विधानपरीषद सदस्यांच्या यादीवर निर्णय न घेण्याच्या भूमिकेमुळे विरोधी पक्षाच्या रोषाला राज्यपालांना सामोरे जावे लागले होते विरोधी पक्षाकडून सतत होत असलेली टीका व महापुरुषां विषयी झालेल्या वक्तव्यांमुळे अडचणीत आलेल्या राज्यपालांनी स्वत:हूनच राजीनामा देण्याची ईच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती राष्ट्र पती द्रौपदी मुर्मू यांनी आज अखेर त्यांची ईच्छा पूर्ण केली अशी चर्चा राचकीय वर्तुळात सुरू झाली आहे
 दरम्यान  महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो असे जयंत पाटील म्हणाले. 

नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.  

नूतन राज्यपाल रमेश बैस यांच्याविषयी.... 


रमेश बैस हे मूळचे छत्ती सगढच्या राजपूरचे आहेत. त्यां चा जन्म २ ऑगस्ट १९४७ सालचा असून ते ७५ वर्षां चे आहेत. या आधी त्यांनी झारखंडचं राज्यपा लपद भूषवलं आहे.हे तर त्या आधी त्रिपुराच्या राज्यपालपदाचाही कारभार सांभाळला आहे. हे भाजपचे सदस्य असून १९९९ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)) होते.
१९७८ साला पासून रमेश बैस यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १९७८ ते १९८३ पर्यंत ते रायपूरमधून नगरसेवक राहिले होते. पुढे ते मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यपदी निवडून गेले. मध्य प्रदेश विधानसभेच्या अनुमान समिती, पुस्तकालय समितीचे सदस्य राहिले आहेत. मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. १९९८ साली मंत्रिपद १९९८ साली रमेश बैस यांची केंद्रीय पोलाद आणि खाण राज्यमंत्रिपदी नियुक्ती केली गेली. 
१९९९ साली बैस चौथ्यांदा खासदार बनले. २००४ साली बैस यांची पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅससंबंधीच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली गेली. रमेश बैस तब्बल ७ टर्म लोकसभा खासदार म्हणून कारकिर्द भूषवली आहे.
 

मोदी सरकारच्या काळात राज्यपाल 


मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीला रमेश बैस यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती . त्या नंतर बैस यांना झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलं होतं. आता त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपा लपदाची धुरा असणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या