शिक्षण क्षेत्रातील नवीन बदल आत्मसात करा : डॉ. तांबे

संगमनेर : शिक्षण हे समाज विकास व समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून आधुनिक, जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण क्षेत्रात जे नवीन बदल होत आहे त्याचा स्वीकार करणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन मा. आमदार डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर, प्राचार्य डॉ. अनुश्री खैरे, प्राचार्य डॉ. सुभाष कडलक, उपप्राचार्य डॉ, बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, डॉ. सुहास आव्हाड आदी उपस्थित होते.
यावेळी मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील पारंपारिक दृष्टिकोन बाजूला ठेवून शिक्षण क्षेत्रातील नवीन बदलांचा स्वीकार विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी केला पाहिजे. त्यासाठी सरकारने शिक्षण क्षेत्रावर होणार्‍या खर्चात वाढ केली पाहिजे तरच आपल्याला अपेक्षित उद्दिष्दष्ट्यो साध्य करता येतील याचबरोबर संशोधन क्षेत्रात देखील मोठी संधी आहे. त्यासाठी सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. खेडेकर मार्गदर्शन करताना म्हणाले कि, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. या धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाची उद्ष्ट्यिो साध्य करताना सरकार, शैक्षणिक संस्था ,प्राध्यापक यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी हे धोरण समजून घेऊन त्याविषयी सकारात्मकता तयार करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी आणि त्या धोरणापुढील आव्हाने या विषयी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या