अखेर गुहामधील १४४ कलम हटविले

परंपरागत पूजाअर्चाला प्रशासनाची परवानगी


राहुरी  : कानिफनाथ बाबा हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे, गुहाचा राजा कानिफनाथ माझा. अशा घोषना देत गुहा ते राहुरी असे १२ किलो मीटर रॅली काढून हजारो नाथ भक्तांनी आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी राहुरी शहरातून मोर्चा काढला. राहुरी तालूक्यातील गुहा येथील कानिफनाथ महाराज मंदिर परिसरात लागू करण्यात आलेले कलम १४४ ‌हे रद्द करून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. 
            राहुरी तालूक्यातील गुहा येथे काही दिवसांपासून हिंदू मुस्लीम असा वाद निर्माण झाला. हा वाद तेथील हिंदू धर्मीयांचे कानिफनाथ मंदिर व मुस्लिम धर्मीयांची मस्जिद या गोष्टीवरून वाद उफाळून आला. सदर उफाळून आलेला वाद शांत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी गुहा परिसरात कलम १४४ लागू केले होते. त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या आक्रोश वाढला. आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी हजारों नाथ भक्तांनी एकत्र येऊन राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा आणला. गुहा येथे लागू केलेले कलम १४४ व आपल्या इतर मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला. दुपारच्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या गेटसमोर कानिफनाथ महाराजांची आरती करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी प्रशासन अधिकाऱ्यां बरोबर चर्चा केली. यावेळी आंदोलन कर्त्यांकडून सात मागण्या प्रशासना पूढे ठेवल्या होत्या. त्यापैकी कानिफनाथ मंदिरा वरील कलम १४४ हटवून हिंदू धर्मीयांना मंदिर खुले करून देण्यात आले. कानिफनाथ मंदिरात पूर्वापार चालत आलेली पूजा, आरती व पंचामृत अभिषेक, महाप्रसाद यास कुठलीही बाधा येणार नाही. तसेच मंदिरात पूजन करण्यास मुस्लिम धर्मीयांकडून कोणताही अडथळा होणार नाही. या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. 
          उर्वरीत चार मागण्या ह्या न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र मंदिरावरील कलम १४४ हटवून मंदिर खुले करण्यात आल्याने आंदोलन कर्त्यांनी उपोषण रद्द करून प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी श्रीरामपूर येथील प्रांत अनिल पवार व राहुरी येथील पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हजारो महिला पुरूष उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या