Breaking News: सोनारावर खुनी हल्ला

सोन्याचांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी गंभीर जखमी

पाथर्डी : शहरातील नवी पेठेतील सोन्या चांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून अर्जुना लॉन्स च्या पाठीमागे असलेल्या घरी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर शेवगाव रोडवर खुनी हल्ला करून सोन्याची बॅग पळवविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.चिंतामणी यांना गंभीर इजा झाली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहे.दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या