शेतकऱ्याचा नादच करायचा नाय.... भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिला "गोऱ्हा"



भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा "गोऱ्हा" 




रांजणगाव गणपती (तेजस फडके) 


आजकाल सगळीकडे वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बैलगाड्याचा एक "गोऱ्हा" भेट म्हणुन दिलाय. त्यामुळे या अनोख्या भेटवस्तूची परिसरात चर्चा आहे. 

रांजणगाव गणपतीचे युवा उद्योजक आणि प्रसिद्ध गाडा मालक नानाश्री ग्रुप बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल खेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मोठे बंधू युवा सेनेचे जिल्हा संघटक वैभव खेडकर यांनी स्वतःच्या गाडाशौकीन भावाला वाढदिवसाची गिफ्ट म्हणुन थेट कर्नाटक राज्यातुन बैलगाडा शर्यतीचा सुमारे 60 हजार किंमतीचा गोऱ्हा आणुन भेट देत अनोखे सरप्राईज दिले आहे.

यावेळी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अतुल खेडकर ,आव्हाळवाडीचे प्रसिद्ध गाडा मालक महेंद्र कुटे, वैभव खेडकर, विशाल खेडकर, धनंजय पाचुंदकर, विनायक खेडकर, पांडुरंग खेडकर, दिपक खेडकर आदी मित्र परिवार उपस्थित होता.

आजोबांपासुन बैलगाड्याची परंपरा...


गाडा मालक विशाल खेडकर हे रांजणगाव गावातील जुने प्रसिद्ध गाडा मालक रोकडोबा घाटाचे मानकरी दगडू विठोबा खेडकर आणि प्रभाकर खेडकर यांचे नातू आहेत. आपल्या पूर्वजांचा गाड्याचा छंद आजहि विशाल खेडकर हे अतिशय चांगल्या प्रकारे जोपासत असुन आजही त्यांच्या गोठ्यात बैलगाडा शर्यतीची 9 ते 10 बैल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या