विशेष लेखा परीक्षक किसन सागरसह दोघे लाच घेताना पकडले

 बंद पतसंस्थेचे चांगले लेखापरीक्षण....



नेवासा : बंद असलेल्या पतसंस्थेचा लेखापरीक्षण अहवाल चांगला द्यावा व असलेल्या पावत्यांचा व्याजासह उल्लेख त्यात करावा, यासाठी तीन लाखाची लाच मागणाऱ्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक किसन सागर याला व त्याच्या साथीदार तय्यब पठाण यास एक लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. 


   पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी हा एका पतसंस्थेचा चेअरमन होता. त्याच्या पतसंस्थेचे लेखापरीक्षण आरोपी किसन दिंगबर सागर (वय ५५, विशेष लेखा परीक्षक, वर्ग २, जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालय, सहकारी संस्था, अहमदनगर) यांच्याकडे सोपवण्यात आले होते. सदरच्या पतसंस्थेमध्ये संबंधित फिर्यादी व त्याचे नातेकवाईक तसेच मित्र मंडळाच्या असलेल्या पावत्याचा व्याजासह उल्लेख लेखापरीक्षण अहवालात करावा, यासाठी व लेखापरीक्षणावर चांगलं लिहावे, यासाठी आरोपी किसन सागर याने फिर्यादीकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. शेवटी तडजोड करत दोन लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले. आज दुपारी नेवासा फाटा येथील बाळूमामा ज्युस सेंटर या दुकानांमध्ये फिर्यादी कडून दोन लाखांपैकी एक लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत खात्याचे अधिकारी हरीश खेडकर व त्याच्या सहकाऱ्यांनी आरोपीस व त्याचा साथीदार तय्यब वजीर पठाण (वय ४८, खाजगी लेखा परीक्षक, राहणार जळके खुर्द तालुका नेवासा) याना रंगेहात पकडले. 

  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला प्र वि अहमदनगर यांचे सह पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हरुन शैख, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांनी कारवाई ही कारवाई केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या