- हरिहर केशव गोविंद महाराजांच्या यात्रेत दोन कमीट्यांचा वाद
- किर्तन महंत रामगिरी महाराजांचे की महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे..?
- प्रांताधिकारी अनिल पवार यांच्यासमोर आज होणार निर्णय
भरत थोरात l राष्ट्र सह्याद्री
उक्कलगाव : श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या यात्रेनिमित्त उकल गावात दोन यात्रा कमिटी निर्माण झाल्या. दोन्ही कमिटीने वेगवेगळे आयोजन आणि नियोजन केले. यात्रेनिमित्त कीर्तन कुणाचे होणार यावरून वाद विकोपाला गेला. अखेर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी आणि पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या उपस्थितीत दोन्ही कमिट्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. रात्री नऊ वाजता सुरू झालेली ही बैठक अकरा साडेअकरा वाजेपर्यंत चालली. तरी ती निष्फळ ठरली. यात्रेवरून समिट घडवण्याच्या या बैठकीत मात्र तमाशाच झाला. वाद झाल्यानंतर निर्णयाविना बैठक आटोपती घ्यावी लागली. आज मंगळवारी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्यासमोर याबाबत बैठक होणार आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावची श्री हरिहर केशव गोविंद महाराजांची यात्रा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार असून अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे.
मात्र,अद्यापही किर्तनावरून सुरू झालेला गावाचा दोन्ही गटातील वाद मिटविण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी 9 वाजता गावकऱ्यांसमवेत शांतता कमिटी बैठक ग्रामपंचायत कार्यालयासमोर पार पडली. यावेळी असंख्य गांवकरी एकत्रित जमले होते. पोलिसांनी एकाएकास बोलण्यास संधी देवून म्हणणे ऐकून घेतले. कोणी मध्येच बोलू नये अशी घाट पोलिसांनी घातली. सगळ्याना बोलण्याची संधी मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. बैठक सुरू झाली असताना मात्र दोन्ही गटाकडून किर्तनचा मुद्दा हा प्रश्न महत्वाचा असताना व्यक्तीगत हावेदावेमुळे गोंधळ
सुरू झाला. जेथे समेट करण्यासाठी आलेल्या पोलिसासमोर कार्यकर्ते एकमेकांवर धावून आले. लगेच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
यावेळी दोन्ही गटाने आपआपले पोलिसांसमोर लेखाजेखा मांडला मात्र, दोन्हीही गटाकडून एकमेकांना उत्तरास _प्रतित्तर देत होते. काही अंतर्गत गोष्टी बाहेर काढल्याने तेथे आणखी वादाची ठिणगी पडली. ज्या किर्तनाच्या मुद्द्यावरून पडलेली ठिणगी हि देवस्थानापर्यत चर्चेत गेली होती. पोलिसांनी गावकऱ्यांना मत मांडण्यास सांगितले काहींनी सांगितले 'गादीला मान' द्या. तर काहींनी 'रूढीपंरपरेनुसार चालेल्या प्रथा सुरूच रहाणार', असे यावेळी सांगितले. दोन्हीही गटाकडून एकमत न होत असलेल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी प्रशासकीय कारवाईची माहिती द्यावी लागली. कृषी विस्तार अधिकारी श्री मेहर उक्कलगाव चे प्रशासक आहेत. मात्र ते या बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रांत अधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
"मागील काही वर्षाच्या माहिती तपासूनच प्रांताधिकारीना अहवाल सादर करण्यात येईल. गावातील वाद गावात मिटावा अशी आमची धारणा असताना तुम्हीच आमच्यासमोरच वाद घालता हेच कितपत योग्य आहे? किर्तनावरती वाद मिटत नसेल तर प्रशासकीय पातळीवर अहवाल सादर करू".
- संदीप मिटके, पोलीस उपाधीक्षक श्रीरामपूर.
........
0 टिप्पण्या