धक्कादायक... २० वर्षीय भावाचा अल्पवयीन बहिणीवर बलात्कार,

 


गरोदर राहिल्याने समोर आला धक्कादायक प्रकार

प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री 
संगमनेर

वीस वर्षीय भावाने आपल्या एकत्र कुटूंबातीलच १७ वर्षाच्या चुलत बहिणीवर वारंवार बलात्कार केल्याचे व त्या संबधातून ती गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात समोर आली आहे. पिडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मोलमजुरी करुन एकत्र कुटूंब चालविणाऱ्या दोन भावंडाच्या कुटूंबात ही धक्कादायक घटना घडली असून वीस वर्षाच्या भावाने आपल्या सतरा वर्षाच्या बहिणीला भुरळ घालत काही महिन्यापासून तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. मुलीचे पोट वाढल्याने आईच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे पिडीतेला तातडीने लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात अत्याचारासह बालकांचे लैगीक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलिसांनी रात्रीच आरोपीला अटक केल्याची माहिती मिळाली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या