दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व मिठाई देऊन स्वागत

 




भिगवण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला दि.2 पासून सुरुवात झाली येथील क्षीरसागर विद्यालय आणि भैरवनाथ विद्यालय या दोन परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत या केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व मिठाई देऊन उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.

क्षीरसागर विद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकूण 545 विद्यार्थी परीक्षा देत आहेत यामध्ये क्षीरसागर विद्यालयासह श्रीराम विद्यालय,स्वामी चिंचोली, भैरवनाथ विद्यालय खडकी, सरस्वती विद्यालय रावणगाव, राजेश्वर विद्यालय राजेगाव (ता. दौंड),त्रिमुर्ती विद्यालय टाकळी, राजेभोसले विद्यालय जिंती (ता. करमाळा), ग.दा.सप्तर्षी विद्यालय खेड (ता.कर्जत) या विद्यालयातील विदयार्थी प्रविष्ट झाले आहेत तर भैरवनाथ विद्यालय या केंद्रावर दत्तकला स्कूल स्वामी चिंचोली (ता.दौंड), विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल भिगवण, आदर्श विद्यालय भिगवण, माध्यमिक विद्यालय विरवाडी, एल.जी.बनसुडे विद्यालय पळसदेव (ता.इंदापूर) येथील विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सुरक्षित व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात येणार असुन त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचे केंद्रसंचालक विद्या घाडगे व संजय गावडे यांनी सांगितले. भिगवण पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दोन्ही परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.



यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित क्षीरसागर,सचिव प्रसाद क्षीरसागर,प्रा.तुषार क्षीरसागर, अविनाश गायकवाड,सुमन मकवाणा,अरुण नवले,अजित कांबळे तसेच अमोल खानावरे, संजय खाडे,संतोष सवाने,संजय चौधरी,किरण रायसोनी,निखिल बोगावत,मोहन काळे,जितेंद्र नेमाडे,यशवंत चव्हाण रोटरी क्लब भिगवणचे अध्यक्ष डॉ अमोल खानावरे,खजिनदार संतोष सवाने, उपाध्यक्ष किरण रायसोनी, संजय खाडे, रणजीत भोंगळे, रियाज शेख,संजय चौधरी, डॉ.अमित खानावरे, निखिल बोगावत, सौ. सारिका सवाणे तसेच भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य श्री गावडे सर व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता..







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या