खानगल्लीत कुंटणखान्यावर छापा; पाच महिलांसह अन्य तिघांना पकडले


1,19,763/- रुपयांचा मुद्देमाल जप्त; सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाची कारवाई

Rashtra Sahyadri : Deepak Barkase


 वैजापूर : 

शहरातील खानगल्लीत सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच महिलांसह अन्य तिघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईलसंच असा एकूण एक लाख 19 हजार 763 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 20 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कुंटणखाना चालविणा-या दोन महिलांसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शहरातील खानगल्लीत एका इमारतीत वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला पाठवून सापळा रचला. ग्राहकाने येथे व्यवसाय सुरू असल्याची खात्री केल्यानंतर पोलिसांच्या पथकास इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला असता वेशा व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह वेशागमन करणाऱ्या तिघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 36,000/- रुपये किमतीचे 10 मोबाईल मोबाईलसंच, 81,763 रुपये रोख, 2000/- रुपये किंमतीचे अन्य साहित्य व दहा निरोधचे खोके असा एकूण 1,19,763/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी विचारपूस केली असता गीताबाई गोरखनाथ शिंदे, अनिता मिथुन गायकवाड, आरेफ शेख यांच्या सांगण्यावरुन वेशा व्यवसाय करीत असल्याचे सांगीतले. या व्यवसायातून मिळालेले अर्धे पैसे आम्ही त्यांना देत असल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले. 

याप्रकरणी तिघांविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात स्त्री व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, श्रीराम काळे, मोईस बेग, ज्ञानेश्वर शिंदे, अजय गोलवाल, योगेश कदम, गोपाल जोनवाल, दिनेश गायकवाड, प्रशांत गीते, विजय भोटकर, पंकज गाभूड, गणेश पैठणकर, नवनाथ निकम, वर्षा गादेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या