श्रीरामाचा पाळणा हलला... रहाट पाळणा मात्र हलणार नाही

नगरपालिका प्रशासनाचा निर्णय ; प्रभू श्रीराम जन्मोत्सवास उत्साहात प्रारंभश्रीरामपूर : सालाबाद प्रमाणे व रामनवमी उत्सवाला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. झेंडा मिरवणुकीनंतर दुपारी बारा वाजता राम मंदिरात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामाचा पाळणा हलवून आरती करण्यात आली. यात्रोत्सवातील रहाटपाळण्यावरून रात्री अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वादन झाल्यानंतर थत्ते मैदान तसेच खाजगी जागेतील पाळणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

 आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, भाजपचे तालुकाध्यक्ष माजी सभापती दीपक पटारे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालक मंजुश्री मुरकुटे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष राम टेकावडे, प्रांत अधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह शहरातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, अधिकारी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा पाळणा हलवण्यात आला. शहरातील विविध तरुण मंडळांनी तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने देखील झेंडा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विक्रीसाठी विविध वस्तूंचे दुकाने सज्ज झाली आहेत. कोरोना प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच यात्रा मोठ्या प्रमाणात भरत आहे. असे असताना यंदा नागरिकांना पाळण्याचा आनंद घेता येईल की नाही? याबाबत शंका निर्माण झाली आहे.

पाळण्याचा ठेका देण्यावरून वाद झाल्यानंतर परिवर्तन समितीने राजकारण यांच्या खाजगी जागेत पाळणे उतरविले. पालिकेने राम मंदिर यात्रा कमिटीला पाळण्याचा ठेका दिला. मात्र त्यांना पाळणे मिळाले नाही. खाजगी जागेतील पाळणे बंद करावेत अशी मागणी यात्रा कमिटीने केली. यावर तोडगा काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र तोडगा निघण्याऐवजी वाद उद्भवला. त्यानंतर सत्य मैदानावरील तसेच राजकर यांच्या खाजगी जागेतील दोन्ही ठिकाणचे पाळणे बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय प्रशासनाने घेतला. 

दुसरीकडे खाजगी जागेत पाळणे उतरविलेली परिवर्तन समिती हा निर्णय मान्य करायला तयार नाही. पाळणे सुरू ठेवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आज दिवसभरात दोन्ही गटाच्या याबाबत बैठका होतील, त्यानंतर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यात्रेकरूंच्या आनंदासाठी पाळणे चालवण्याची परवानगी द्यावी. आता पाळणे नवीन जागेत हलवणे शक्य नाही. शिवाय पाळणे चालवण्यासाठी लागणारी पोलिसांची परवानगी, अधिकृत वीज जोडणी, फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स, तात्पुरते शौचालय, विमा आणि मनोरंजनकर ही सर्व व्यवस्था केल्याचा दावा परिवर्तन समितीने केला आहे. 

___________


पाळणे सुरूच राहणार : सावंत


बुधवारी रात्री उशिरापर्यंत प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या जालनामध्ये राहत वाढण्याच्या परवानगी वरून चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान यात्रा कमिटीच्या सदस्यांनी नाशिक वरून आलेले पाळणे चालक विनोद सावंत यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही गुंड पाळण्याचा आरोप करता, मग बाहेरगावच्या पाळणे चालकांना मारहाण करणारे गुंड नाही तर कोण आहेत? असा सवाल परिवर्तन समितीचे प्रमुख नागेश सावंत यांनी केला. अधिकाऱ्यांनी पाळण्याला परवानगी नाकारली असली तरी खाजगी जागेत लावलेले पाळणे नागरिकांसाठी सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. 

__________


प्रशासनाच्या निर्णयाचा आदर : चित्ते


प्रशासनाच्या निर्णयानंतर यात्रा कमिटीने थत्ते मैदानावर लावलेले पाळणे उचलायला सुरुवात केली. आम्ही प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करतो, स्वखर्चाने पाळणे आणले होते आणि ते काढून पोहोचही करू, असे भाजपचे नेते प्रकाश चित्ते म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या