Crime : बनावट नवरी प्रकरणातील आरोपीने घेतले पेटवून...

 अटक होण्याची भीती... पोलिसांनी पेटवल्याचा नातेवाईकांचा आरोपविशेष प्रतिनिधी l राष्ट्र सह्याद्री


श्रीरामपूर : लग्नाळू मुलांना नवरी देण्याच्या आमिष देऊन फसवणाऱ्या टोळीतील संशयित आरोपीने पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. श्रीरामपूर शहरालगत असलेल्या दत्तनगर ग्रामपंचायत हद्दीत तनवीर वेल्डिंग वर्क्स दुकानांमध्ये ही घटना घडली. गंभीर भाजलेल्या संशयित जाकिर बबन पठारे यास लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनावट नवरी व लग्न प्रकरणी जालना जिल्ह्यातील गोंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. या गुजराती तर आरोपींसह जाकीर पठारे याचाही समावेश होता. काल जालना जिल्ह्यातील पोलीस या प्रकरणात तपासासाठी श्रीरामपूरला आले होते. पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने जाकीरने वेल्डिंगच्या दुकानातच रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या जाकीर पठारे याला लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांनीच त्याला पेटवले असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या