पारनेर : राज्याच्या ग्रामीण भागातील पारनेर महाविद्यालय नॅकचे A++ मानांकन प्राप्त करत सर्वोच्च स्थानावर गेले असुन,राज्याच्या ग्रामीण भागातील गुणवत्ता सिध्द केलेले पारनेर हे एकमेव महाविद्यालय असल्याचे गौरवोद्गार अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी काढले.
A++ मानांकन प्राप्त झाल्यावर पारनेर महाविद्यालयामधे आनंदोत्सव यशाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी बोलताना अध्यक्ष नंदकुमार झावरे म्हणाले,
महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी,पत्रकार या सर्वांचा या यशामधे समावेश आहे.तसेच पारनेर महाविद्यालय ताबडतोबिनी स्वायत्त महाविद्यालय करण्यासाठी प्रयत्न सुरु करा अशी घोषणा केली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे,जेष्ठ विश्वस्थ सिताराम खिलारी,विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,विद्यार्थी, पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.
पारनेर महाविद्यालयाचे नुकतेच चौथ्या सायकलचे नॅक पुनर्मूल्यांकन पार पडले. त्यामध्ये महाविद्यालयाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नॅक पूनर्मूल्यांकनात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. नेक मूल्यांकन प्रक्रियेत उत्तराखंड येथील कुलगुरु होशीयार धामी, कर्नाटक येथील रंगप्पा व अरुणाचल प्रदेश येथील खांडू हे सर्व सदस्य सहभागी झाले होते.
पारनेर महाविद्यालय हे अद्यावत संगणीकृत महाविद्यालय,उत्कृष्ट निकालाची उज्ज्वल परंपरा असलेले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट प्राचार्य या पुरस्कारांबरोबरच विद्यापीठ व राज्यस्तरीय पातळीवर ३५ आणि राष्ट्रीय स्तरावर १८ पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.
महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बी.ए ,बी.कॉम,बी.एस्सी बीबीए- सीए, बी.एस्सी (संगणकशास्त्र ), एम.एस्सी रसायनशास्त्र (ऑरगॅनिक आणि अॅनालिटिकल ), एम.एस्सी, (फिजिक्स ), एम.एस्सी (गणित ), एम.एस्सी (बॉटनी ), एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स ), एम.कॉम., एम.ए (मराठी ,भूगोल , हिंदी, इंग्रजी,), सॉफ्टवेअर अँण्ड रिनेवेबल एनर्जी तसेच वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र,भूगोल, हिंदी या विषयांचे पीएच् .डी सेंटर अद्यावत आहेत तसेच भौतिकशास्त्र, मराठी या विषयांचे पीएच.डी रिसर्च सेंटर नव्याने सुरु होत आहेत.
महाविद्यालयात सुसज्ज विज्ञान, कॉम्प्युटर व भाषा विषयक प्रयोगशाळा, अद्यायावत व्हर्चुअल क्लासरूम, ई-लायब्ररी व इंटरनेट सुविधा, नियमित पालक सभेद्वारे प्राचार्य शिक्षक चर्चासत्रांचे नियोजन, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक, उज्वल भवितव्यासाठी करिअर मार्गदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन, क्लास टेस्ट व सेमिनार इत्यादींचे यशस्वी आयोजन, वैयक्तिक लक्ष व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा इ.विशेष भर, अभ्यासेतर उपक्रमांत विद्यार्थ्यांना असंख्य संधी, कृती व प्रात्यक्षिकांवर आधारित शिकविण्याची सुविधा, विद्यार्थिनींसाठी सुसज्ज राजमाता जिजाऊ वसतिगृह तसेच स्वतंत्र रिडींग रूमचीही व्यवस्था तसेच उत्कृष्ट मेस व सुरक्षित अशा प्रकारचा स्वच्छ व सुंदर असा परिसर, तसेच विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र वसतिगृहाची सोय, उत्कृष्ठ मेसची सुविधा उपलब्ध, ऑडिओ-व्हिडिओ पद्धतीने मार्गदर्शन, भव्य सेमिनार हॉल, विविध शिष्यवृत्तींची सोय,ऑनलाइन टिचिंगची उत्तम सुविधा, सुसज्ज क्रीडांगण, आधुनिक क्रीडा साधने,प्रशस्त जिमखाना हॉल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयातंर्गत विद्यार्थी अपघात विमा योजना, स्वतंत्र प्लेसमेंट कक्ष व कॅम्पस इंटरव्ह्यू इत्यादींचे आयोजन अतिशय यशस्वीरित्या करण्यात येते यामध्ये कॅम्पस मधूनच अनेक भारतीय,परदेशी कंपन्या महाविद्यालयात सातत्याने येत असतात व अनेक होतकरू, आणि हुशार विद्यार्थ्यांची निवड या कंपन्यांमध्ये होत असते. आजवर अनेक विद्यार्थी देशात व परदेशात विविध ठिकाणी अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
याबरोबरच बदलत्या काळाबरोबर यशस्वी होण्यासाठी सी, सी प्लस प्लस, कोर जावा, व्हीबी, व्हिबी.नेट या विषयांचे व मॅनेजमेंट विषयांचे अद्यावत ज्ञान. आय.सी.टी, फंक्शनल इंग्लिश, आय.टी. अॅण्ड जर्नालिझम, कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश, नर्सरी मॅनेजमेंट अँड व्हार्टिकल्चरल प्रॅक्टिसेस हे यु.जी.सी.मान्यताप्राप्त कोर्सेस सुरू आहेत.
तसेच अनेक नवनवीन विषयांचे सर्टिफिकेट कोर्स सुद्धा महाविद्यालय सुरू आहेत. यामध्ये जर्मन व जपानी भाषेबरोबरच इतर परदेशी भाषांचे कोर्सेस लवकरच सुरू होत आहेत. मोडी लिपी ,मराठी शुद्धलेखन, सेफ्टी अवरनेस,Computerised Accounting,Safety awareness, Pharmaceutical Chemistry हे कोर्सही सुरू आहेत. तसेच नवनवे कोर्स लवकरच सुरू होत आहेत कारण महाविद्यालयाने अनेक नामवंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत त्यामुळे अनेक नवे कोर्स सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.
महाविद्यालयात एन.सीसीचे अतिशय उत्तम असे युनिट असून त्याद्वारे उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन भारतीय सैन्य दलात विविध पदांवरती महाराष्ट्र पोलीस,केंद्रीय पोलीस अशा विविध ठिकाणी भरती होण्याची संधी प्राप्त होत असते. याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ अतंर्गत कमवा व शिका योजनेत अनेक विद्यार्थी काम करत करत शिक्षण घेत आहेत. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद एकत्र येऊन होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गेली सात - आठ वर्षापासून आर्थिक मदत करताहेत महाविद्यालय हा अभिनव उपक्रम राबवणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव महाविद्यालय आहे. तसेच राजमाता जिजाऊ मंच, विज्ञान मंडळ, भाषा मंडळ, जागर जाणिवांचा,चेतना नियतकालिक अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विविध कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते.त्यामुळे या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. .
महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन करणारे दूरदृष्टी असलेले सर्व संस्था पदाधिकारी, सातत्याने कर्तव्यदक्ष असणारे प्राचार्य, कर्तव्यदक्ष अंतर्गत गुणवत्ता कक्ष विभाग आणि जबाबदार, गुणवंत प्राध्यापक वृंद यामुळे महाविद्यालय दिवसेंदिवस उंच भरारी घेत आहेत.
महाविद्यालयास A++ ही सर्वोच्च ग्रेड मिळाल्या निमित्ताने आनंदोत्सव यशाचा या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार झावरे पाटील ,सचिव जी डी खानदेशेसाहेब व विश्वस्त सिताराम खिलारी सर,अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य,अनेक पत्रकार उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गुणवत्ता सिध्द केलेले पारनेर महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे.महाविद्यालय स्वायत्ततेच्या दृष्टीने संस्था प्रयत्नशील आहे.येथे मुलींच्या शिक्षणाला विशेष प्राधान्य आहे.
मा.आ.नंदकुमार झावरे पाटील अध्यक्ष,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर.
0 टिप्पण्या