राजुरी : सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात फेब्रुवारी महिन्याचे धान्य वाटप करत असताना सेल्समनने फेब्रुवारी महिन्याचा थंब घेतला काही लोकांचे फेब्रुवारी बरोबरच मार्च महिन्याचे ही बिल निघाले. याची तक्रार काही लोकांनी तहसीलदार साहेबांकडे केली. संस्थेच्या सेल्समनने झालेली चूक मान्य करून जरी बिल निघाले असले तरी सर्वांना धान्य देण्यात येईल असे सांगितले. सदर तक्रारीच्या अनुषंगाने तालुका पुरवठा अधिकारी साहेबांनी राजुरी संस्थेत येऊन संपूर्ण माहिती घेतली व धान्याचा पंचनामा केला असता गोडाऊन मध्ये संपूर्ण धान्य आढळून आले. त्यापैकी कोणत्याही धान्याची चोरी झालेली नव्हती तसेच बाहेर बाजारातही धान्य विकले गेलेले नव्हती. तेव्हा प्रत्येक गरिबाला त्याचे महिन्याला मिळणारे हक्काचे धान्य चालू महिन्यात निश्चितच मिळणार आहे अशी ग्वाही तालुका पुरवठा अधिकारी साहेबांनी दिली.
पण तत्पूर्वीच काही लोकांनी चोर चोर म्हणून आवई उठविली व संस्थेची बदनामी केली. तसेच या सर्व प्रकारात माननीय नामदार साहेबांचे नाव गोवण्याचाही निंदनीय प्रकार राजकारण करण्याचा केविलवाण्या प्रयत्न करण्यात आला. नामदार साहेब हे तालुक्याचे नव्हे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेते आहेत. महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मधील एक नंबरचे मंत्री आहेत. त्यांचा या गोष्टीशी काडीमात्र ही संबंध नाही. राजुरी सोसायटीचे तेरा ही संचालक सधन आहेत. दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ चोरून खाणारे औलाद नाही. सेल्समन कडून काही चुका होत असतील त्यात निश्चितच सुधारणा करू.
राजकारण करून गावाचे नाव बदनाम करू नये. बाकी राजकारण करायला आम्ही समर्थ आहोत. पाच हजारापासून ते सव्वा लाख रुपयापर्यंत खंडणी मागून जगणारे काही लोक गावात धिंगाणा घालत आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे. प्रत्येकाला धान्य मिळेल अशी गोरगरिबांना खात्री होती म्हणूनच या चौकटी बरोबर एकही गरीब उभा राहिला नाही, कोणी तक्रारही केली नाही. तेव्हा या गोष्टीचा बोध घेऊन कोणीही जाणीवपूर्वक गावाची बदनामी करू नये.सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात पूर्वी धान्य आल्यानंतर दोन-तीन दिवस दुकान उघडले जायचे. कुणाला धान्य मिळाले कुणाला नाही मिळाले तरी धान्य संपले म्हणून दुकान बंद केले जायचे व काही लोकांच्या घरी धान्याचे कट्टे इमाने इतिबारे पोहोच केले जायचे.
आपण हे सर्व बंद करून गरीबाचे धान्य गरिबालाच मिळाले पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून काम केले व गरिबांना धान्य व्यवस्थित वाटप केले. त्याचाच परिणाम म्हणून संस्थेच्या सुज्ञ सभासदांनी व ग्रामस्थांनी राजुरी सोसायटीतील 13 जागा व ग्रामपंचायत येथील बारा जागा आम्हाला देऊन विरोधकांना झिरो दिला. जनता आपल्याला का नाकारत आहे या गोष्टीचा अभ्यास करायचे सोडून नाठाळपणे वागत आहेत. त्यांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट ही जप्त करू कारण जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
0 टिप्पण्या