पारनेर तालुका भाजपाच्या अध्यक्षपदी सुनिल थोरात यांची निवड..



अखेर पारनेर भाजपामधे खांदेपालट झाला.


पारनेर  : अखेर पारनेर भाजपात खांदेपालट झाला आणि पारनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी सुनिल थोरात यांची निवड करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग यांनी पत्राद्वारे सुनिल थोरात यांची नियुक्ती केली. पारनेर तालुक्यामधे आपला अनुभव पणाला लावत,समाजातील तळागाळापर्यत पक्ष विस्ताराच्या दृष्टीने जबाबदारी सुनिल थोरात हे प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

या अगोदर वसंत चेडे हे पारनेर तालुका अध्यक्ष होते.त्यांचा ३ वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने भाजपाने हा खांदेपालट करत पुढील जबाबदारी सुनील थोरात यांच्या खांद्यावर देत त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.

सुनिल थोरात हे पारनेर तालुक्यातील मुंगशी गावचे सुपुत्र असून, ते गेली ८ ते १० वर्षापासुन ते पारनेरसह जिल्ह्यामधे पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत.यापूर्वी त्यांनी शिवसेना पक्षातही त्यांचे कामकाज चांगले राहीले आहे.



     सुपा जिल्हा परिषद गटामधुन थोरात यांच्या पत्नी श्रीमती निर्मला सुनील थोरात यांनी राष्ट्रवादीच्या राणी लंके यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.सुनील थोरात हे एक चांगले उद्योजक असुन,त्यांचा हॉटेल, व्यवसायासह इतर छोटे मोठे उद्योग आहेत.यापूर्वी सुपा परिसरात त्यांनी अनेक सामाजीक उपक्रम राबविले आहेत.

सध्या देशात व राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना पक्षाची सत्ता आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखेपाटील व नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हेसुध्दा भारतीय जनता पक्षाचेच आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यासाठी अनेक विकासाच्या योजना,विकास कामे थोरात यांना करता येतील.

तसेच पक्ष संघटना वाढीसाठी व तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पारनेर येथे संपर्क कार्यालय असणे गरजेचे आहे.

निवडीनंतर बोलताना सुनिल थोरात म्हणाले,तालुक्यातील महत्वाचे संघटनात्मक बदल करुन नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालत तालुक्यातील समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत भारतीय जनता पार्टीची ध्येय्यधोरणे पोहचविणार असल्याची माहीती सुनील थोरात यांनी दिली.राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखेपाटील,खासदार सुजय विखेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे थोरात यांनी सांगीतले.

थोरात यांच्या निवडीबद्दल महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखेपाटील,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,मा.मंत्री राम शिंदे,खासदार सुजय विखेपाटील,जिल्हा बंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे,मा. जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड,अहमदनगर जिल्हापरीषदेचे मा.उपाध्यक्ष सुजीत झावरेपाटील,भाजपाचे प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, जनता पार्टीच्या महीला जिल्हा आघाडीप्रमुख अश्विनी थोरात तालुक्यातील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र सुनिल थोरात यांना देताना भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसीसिंग व मान्यवर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या