नायगाव जुने प्राथमिक शाळेचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 


श्रीरामपूर :  तालुक्यातील नायगाव जुने या वस्तीवरील ५४ पटाच्या छोट्याशा दोन शिक्षकी प्राथमिक शाळेतील शाळेच्या स्थापनेपासूनचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच अतिशय उत्साहात संपन्न झाले....संध्याकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत असा चार तास चालेला बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम.... तो पण अतिशय शिस्तबद्धपणे…..श्रीगणेश वंदना,लावणीगीत,गवळण,कोळीगीत,प्लॅस्टिक कचरामुक्ती गीत,भक्तिगीते,बालगीते,शिवाजीमहाराज गीत,खंडोबा मिक्स गीत,चित्रपट गीते आदी नृत्यावर विद्यार्थ्यांनी चित्तथरारक नृत्य करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.



        वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त जमा झाला ८०,०००/-(ऐंशी हजार रुपये)इतका निधी...कार्यक्रम खर्च जाता शाळा विकासासाठी शिल्लक राहिले ३३,०००/-(तेहतीस हजार रुपये)….अतिशय प्रचंड गर्दी,बक्षिसांचा प्रचंड वर्षाव...विद्यार्थ्यांचे जबरदस्त नृत्य.... आकर्षक विद्युत रोषणाई...फटाक्यांची आतिषबाजी...सुमधुर साऊंड सिस्टीम....विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र...पालक व ग्रामस्थ आणि विशेष करून माता-भगिनींची लक्षणीय उपस्थिती*...गटशिक्षणाधिकारी श्रीम.साईलता सामलेटी मॅडम,गावचे सरपंच डॉ.रा.ना.राशिनकर,उपसरपंच सौ.मीनाताई लांडे,सेवा सोसायटीच्या चेअरमन सौ.शितल प्रकाश लांडे,पोलीसपाटील राजेंद्र राशिनकर,तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल लांडे,ग्रामपंचायत सदस्य पुष्पा लांडे,लक्ष्मण पवार,सेवा सोसायटी सर्व सदस्य,सर्व ज्येष्ठ नागरिक,बँक ऑफ बडोदाचे सिनिअर मॅनेजर जगन्नाथ लोटके,श्रीरामपूर नगरपालिका बांधकाम अभियंता राम सरगर,शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब सरोदे,विकास मंडळाचे विश्वस्त प्रदीप दळवी,केंद्रसमन्वयक वाघुजी पटारे व तालुक्यातून अनेक मान्यवर शिक्षक बंधू-भगिनींची उपस्थिती...अशा वैविध्यपूर्ण बाबींनी श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव जुने प्राथमिक शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साही वातावरणात पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी श्रीम.साईलता सामलेटी या होत्या. 



         कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमपूजनाने झाली.सुरुवातीला प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांची व लोकसहभागातून शाळा विकास याविषयी माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले.कै.गोरक्षनाथ लांडे यांच्या स्मरणार्थ इंजिनिअर किरणकुमार लांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी सामलेटी व बडोदा बँकेचे मॅनेजर लोटके यांनाही त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय व सामाजिक योगदानाबद्दल शाळा व पालकांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सरपंच डॉ.राशिनकर यांनी शाळेतील दोन्ही शिक्षकांनी कोरोना काळात घरोघरी,मंदिरात,वस्तीवर जाऊन शिक्षण चालू ठेवले याचा आवर्जून उल्लेख केला.गटशिक्षणाधिकारी श्रीम.सामलेटी यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या मोहक नृत्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.शिक्षिका सुजाता सोळसे यांनी पालक व ग्रामस्थांच्या मदतीबद्दल धन्यवाद दिले.दाताने नारळ सोलण्याची कला आत्मसात केलेले पंचायत समितीचे विषय तज्ञ इरफान शेख यांनी दाताने २३२ वा ओला नारळ सोलून उपस्थितांची शाबासकी मिळवली.




      कार्यक्रमाच्या शेवटी झुमका वाली पोर या गीतावर विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ,शिक्षक यांनीही ठेका धरत नृत्याचा आनंद घेतला.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गोखलेवाडी शाळेचे मुख्याध्यापक अनिल ओहळ यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष राशिनकर,उपाध्यक्षा पूजा लांडे ,सर्व माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व पालक,ग्रामस्थ,शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, शिक्षिका सुजाता सोळसे तसेच वार्षिक स्नेहसंमेलन नियोजन समितीचे सदस्य शिवाजी लहारे,निलेश लांडे,महेश राशिनकर,किरण दातीर,किरणकुमार लांडे,जालिंदर राशिनकर,सुनिल दातीर,नवनाथ राशिनकर,डॉ.संदिप लांडे,डॉ. संकल्प राशिनकर,भिमा धसाळ,सुभाष तुपे,रविंद्र दरेकर,रामप्रसाद दातीर व सर्व पालक,ग्रामस्थ,सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक संपतनाना लांडे,रामचंद्र लांडे,रघुनाथ लांडे,चंद्रहस लांडे,बलभीम लहारे,संजय राशिनकर यांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी सर्वांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या